Chikhali : तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज – राहत्या खोलीत तरुणीने पंख्याला (Chikhali ) गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि. 28) दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास मोरेवस्ती, चिखली येथे उघडकीस आली.

अक्षया सुनील गोळसे (वय 20, रा. मोरेवस्ती, चिखली) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षया तिच्या वडील आणि बहिणीसोबत मागील सहा महिन्यांपूर्वी पिंपरी-चिंचवड शहरात आली होती. दहावी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर ती चिखली येथे शिवणकाम शिकत होती. त्याचा क्लास तिने लावला होता. तिच्या बहिणीला देखील नोकरी लागली होती. सोमवारी बहिणीच्या नोकरीचा पहिला दिवस होता.

Aditya-L 1 : चंद्रानंतर इस्रोचे लक्ष आता सूर्यावर; शनिवारी इस्रो घेणार सूर्याच्या दिशेने झेप

सोमवारी सकाळी बहिण कामावर गेली. वडील देखील कामावर गेले असता अक्षया घरी एकटी (Chikhali) होती. तिने राहत्या खोलीत पंख्याला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला. ही घटना दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास उघडकीस आली. तिला पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखल केले असता तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तिच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.