AJit pawar: …म्हणून समृद्धी महामार्गावर अपघात होतात – अजित पवार

एमपीसी न्यूज – राज्य सरकारने समृद्धी महामार्गाचे काम केले असून ४५ हजार कोटींचा हा मार्ग आहे. हा महामार्ग सरळ असल्याने चालकाला इकडे- तिकडे बघावे लागत नाही. त्यामुळे डुलकी येते. चालकाने इकडे- तिकडे बघितले पाहिजे, म्हणजे त्याचा मेंदू काम करेल असे डॉक्टरांनी सांगितले. सरळ चालल्याने चालकाचा मेंदू काम करत नाही. त्यामुळे समृद्धी महामार्गावर अपघात होत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (AJit pawar) यांनी सांगितले.

Aditya-L 1 : चंद्रानंतर इस्रोचे लक्ष आता सूर्यावर; शनिवारी इस्रो घेणार सूर्याच्या दिशेने झेप

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाच्या द्राक्ष परिषदेत पवार बोलत होते. समृद्धी महामार्गामुळे मराठवाडा, विदर्भ, कोकणातील लोकांना फायदा होत आहे. हा मार्ग पूर्ण होण्यापूर्वी एका कंपनीने ३५ हजार कोटीला मागितला आहे. सरकार अजून देत नाही. समृद्धी महामार्गावर अपघात होवू नये यासाठी प्रयत्न चालू आहेत.

वेडीवाकडी वळणे असल्यास अपघात होतात. त्यामुळे मार्ग सरळ केला. पण, चालकाला इकडे- तिकडे बघावे लागत नसल्याने डुलकी यायला लागली. डॉक्टरांना संशोधन करायला सांगितले तर ते म्हणतात चालकाने इकडे- तिकडे बघितले पाहिजे, म्हणजे त्याचा मेंदू काम करेल. सरळ चालल्याने चालक पुढे जाऊन धडकतो.

महाराष्ट्रातील प्रश्न सोडवण्यासाठी मला कोणतीही अडचण नाही. त्याबाबत बैठक घेऊ, होणारी कामे केली जातील. एखादे काम होणार नसल्यास स्पष्टपणे सांगेल. राज्य सरकारशी संबंधित असलेले प्रश्न सोडविले जातील. केंद्र सरकारकडीलही प्रश्न सोडविले जातील. माझे सचिव आशिष शर्मा यांनी दिल्लीत काम केले आहे. त्यामुळे प्रश्न सोडविण्यात अडचण येणार नाही.

आपल्या प्रश्नांबाबत सप्टेंबर महिन्यात बैठक घेतली जाईल. वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी येत आहेत. त्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपला संघ काम करतो. द्राक्ष बागाईतदार संघाच्या सभा कुठे होत होत्या, कशा होत होत्या. हे माहिती आहे. आता काय लखलखाट आला आहे. अजून तर मागितलेले द्यायचे आहे. पण, हरकत नाही सर्वांनीच पुढे गेले पाहिजे असेही ते म्हणाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.