Maval : धामणे गावात सिलेंडरचा स्फोट

एमपीसी न्यूज – मावळ (Maval) तालुक्यातील धामणे गावात सिलेंडरचा स्फोट झाला. यामध्ये एक महिला जखमी झाली आहे. ही घटना सोमवारी (दि. 28) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली.

Talegaon : तळेगावकरांनी घेतला रान भाज्यांचा आस्वाद

अरुण तात्याबा गराडे यांच्या घरी सर्व भावंडे एकत्रितपणे राहतात. घरातील सिलेंडर संपल्याने दुसरा नवीन सिलेंडर जोडत असताना सिलेंडरचा स्फोट झाला. यामध्ये घरातील एक महिला जखमी झाली आहे. त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

स्फोट झाल्यानंतर संपूर्ण घरात आगीचे लोट होते. स्थानिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. सुदैवाने यामध्ये मोठी दुर्घटना टळली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.