Alandi : गळा चिरून तरुणाची आत्महत्या

एमपीसी न्यूज – स्वतःला खोलीत कोंडून घेत चाकूने गळा चिरून तरुणाने आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. 27) सायंकाळी कमळजाई वस्ती, मरकळ येथे उघडकीस आली.

Maval : धामणे गावात सिलेंडरचा स्फोट

लखन भारत यादव (वय 28, रा. कमळजाई वस्ती, मरकळ, ता. खेड. मूळ रा. बिहार) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लखन हा मागील एक महिन्यापूर्वी बिहार येथून पुण्यात कामानिमित्त आला होता. तो त्याच्या मित्राच्या खोलीवर कमळजाई वस्ती, मरकळ येथे राहत होता. तो व्यसनाच्या आहारी गेला होता. त्यासाठी त्याने गावाहून आल्यानंतर त्याचा फोन विकला होता. त्याच्या घरचे लखनच्या मित्राच्या फोनवरून त्याच्याशी संपर्क करत असत.

मरकळ येथील एका कंपनीत तो काम करत होता. रविवारी तो खोलीवर एकटा होता. तर त्याचा मित्र नेहमीप्रमाणे कामावर गेला. दुपारच्या वेळी त्याने भाजी कापण्याच्या चाकूने स्वतःचा गळा चिरून घेतला. गळा कापला. सायंकाळी त्याचा मित्र कामावरून घरी आला त्यावेळी खोलीचा दरवाजा आतून बंद होता. त्याने खिडकीतून आत डोकावले असता लखन रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.

लखनच्या मित्राने तत्काळ पोलिसांना माहिती दिली. आळंदी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मात्र दरवाजा आतून बंद असल्याने अग्निशमन विभागाला पाचारण करून दरवाजा उघडण्यात आला. त्यावेळी खोलीतील गॅस सिलेंडर मधून गॅसची गळती सुरु होती. पोलिसांनी लखन याला पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

लखन याचा विवाह झाला असून त्याला एक लहान मुलगी आहे. त्याची पत्नी आणि कुटुंब बिहार येथे गावी असते. त्याचे मानसिक संतुलन बिघडले होते. तो घरच्यांना देखील बोलत नसे, असे त्याच्या मित्राने पोलिसांना सांगितले. आळंदी (Alandi) पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.