Alandi : फ्री लान्सिंग जॉब पडला महागात

एमपीसी न्यूज – फ्री लान्सिंग जॉब (Alandi) शोधणे एका तरुणाला चांगलाच महागात पडला आहे. फ्री लान्सिंग जॉब संदर्भात आलेल्या लिंकवर क्लिक करून पुढे गुंतवणुकीच्या आमिषाने पैसे दिले असता अनोळखी लोकांनी तरुणाची दोन लाख 10 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना 21 ऑगस्ट 2023 रोजी घडली असून याप्रकरणी 27 फेब्रुवारी 2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी 31 वर्षीय तरुणाने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणाच्या मोबाईलवर फ्री लान्सिंग जॉब संदर्भात एक लिंक आली. तरुणाने त्यावर क्लिक केले असता त्यांना टेलिग्रामच्या एका ग्रुपला जॉईन करून घेत त्यांना नोंदणी करण्यास लावले. तरुणाला ट्रेडिंग अॅपवर गुंतवणूक करण्यास सांगत त्यांच्याकडून दोन लाख 10 हजार 600 रुपये घेतले. त्यानंतर तरुणाने परतावा मागण्यास सुरुवात केली असता (Alandi) त्यांना टेलिग्राम ग्रुपमधून काढून टाकण्यात आले. त्यांनी गुंतवलेले पैसे अथवा त्यावरील नफा न देता त्यांची फसवणूक करण्यात आली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.