Pune : मधुवंती पाटणकर यांचे निधन

एमपीसी न्यूज – संगीत शिक्षिका म्हणून काम केलेल्या मधुवंती मधुकर पाटणकर (Pune)(वय 87) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. कोथरूड मधील जुन्या डॉक्टरांपैकी एक डॉ. मधुकर पाटणकर यांच्या त्या पत्नी होत्या.

 

खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात एक मुलगा, (Pune)दोन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

Pune RTO : दुचाकीचा नंबर चारचाकीसाठी हवा असेल तर… अर्ज करा

आज दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रांतील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.