Khed : जुन्या जमिनीच्या वादातून एकाला पाच जाणांकडून लोखंडी रॉडने मारहाण

एमपीसी न्यूज – जुन्या जमिनीच्या वादातून पाच जणांनी (Khed) लोखंडी रॉडने व लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत गंभीर जखमी केले आहे. ही घटना सोमवारी (दि.25) मरकळ खेड येथे घडली आहे.

याप्रकरणी संतोष शिवराम लोखंडे (वय 50 रा. मरकळ, खेड) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे, यावरून उमेश नारायण लोखंडे , महेश नारायण लोखंडे, किरण लोखंडे, योगिराज उत्तम लोखंडे, प्रशांत लोखंडे यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

LokSabha Elections 2024 : मावळ मतदारसंघ भाजपला सोडा, मला उमेदवारी द्या – यशवंत भोसले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सोमवारी सकाळी त्यांच्या गाईला चारा टाकण्यासाठी जात होते. यावेळी आरोपींनी जुन्या जमिनीच्या वादातून फिर्यादीच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारून खाली पाडले व नंतर लाथा-बुक्क्यांनी (Khed) मारहाण केली. यावेळी फिर्यादीचे भाऊ त्यांना सोडवण्यासाठी आले होते. त्यांना ही आरोपींनी मारहाण केली. यावरून आळंदी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.