LokSabha Elections 2024 : मावळ मतदारसंघ भाजपला सोडा, मला उमेदवारी द्या – यशवंत भोसले

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघात मोठा (LokSabha Elections 2024) औद्योगिक पट्टा आहे. पिंपरी-चिंचवड, तळेगाव, उरण, पनवेल या भागात मोठे उद्योग असून कामगार वर्ग मोठा आहे. श्रमिकांना प्रतिनिधीत्व द्यावे. मावळची जागा भाजपने घ्यावी आणि आपल्याला उमेदवारी द्यावी, अशी मागणी भाजपशी संलग्न असलेल्या राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी आज (मंगळवारी) पत्रकार परिषदेत केली.

कासारवाडी येथे मंगळवारी पत्र परिषद घेऊन भोसले यांनी ही मागणी केली. उद्योजक संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कोलकोटे, एसकेएफचे स्वानंद पाचपाठक, हॉटेल व्यावसायीकांचे प्रतिनिधी दिपक पाटील, विद्यार्थी व युवा संघटनेचे अध्यक्ष दिनेश पाटील, विठ्ठल ओझरकर, नितीन कांबळे, बापुसाहेब वाघेरे विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

PCMC : उपयोग कर्ता शुल्काशिवाय मालमत्ता कर भरा, महापालिकेचे आवाहन

भोसले म्हणाले की, राज्यात 60 ते 70 टक्के कामगार आहे. तो असंघटित आहे. त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी, आवाज उठविण्यासाठी श्रमिकांचा लोकसभेत प्रतिनिधी असावा, अशी कामगारांची भावना आहे. मावळ लोकसभा मतदारसंघ औद्योगिक पट्ट्यात आहे. पिंपरी-चिंचवड उद्योगनगरी, तळेगावदाभाडे, चिंचवड, उरण,पनवेलला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आहे. महायुतीत अनेक ठिकाणी मतदारसंघाची अदला-बदल करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मावळातही बदल करावा. हा मतदारसंघ भाजपकडे घ्यावा आणि कामगारांचा प्रतिनिधी म्हणून मला उमेदवारी द्यावी. (LokSabha Elections 2024) कामगारांच्या प्रतिनिधीला मतदारसंघ दिल्यास राज्यात, देशात भाजपबाबत कामगारांमध्ये सहानुभूती, चांगल्या भावना निर्माण होतील. श्रमिकांची दखल घेतली जाईल. याचा महायुतीला राज्यभरात फायदा होईल. कामगार वर्ग महायुतीच्या पाठिशी उभा राहील.

उद्योजक संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कोलकोटे म्हणाले की, उद्योजकांच्या, कामगारांच्या अडचणी भोसले यांना माहिती आहेत. सर्व उद्योजक कामगार, त्यांच्या पाठिशी आहेत. त्यांना उमेदवारी द्यावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.