Talegaon : तळेगावकरांनी घेतला रान भाज्यांचा आस्वाद

रानभाज्या महोत्सव

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ तळेगाव (Talegaon) दाभाडे , फ्रेंड्स ऑफ नेचर तळेगाव दाभाडे आणि आयुर्वेद व्यासपीठ, पिंपरी चिंचवड शाखा यांच्या वतीने तळेगावकर नागरिकांसाठी ‘रानभाज्या महोत्सव’ लायन्स क्लब च्या लायन डॉ.दिपक शहा सभागृहात आयोजित केला होता ही संकल्पना, फ्रेंड्स ऑफ नेचर तळेगाव दाभाडे चे माजी अध्यक्ष पशुवैद्यक डॉ.गणेश सोरटे यांची होती.

PCMC : रस्त्यावरील खड्डे बुजवा; जनसंवाद सभेत मागणी

‘रानभाज्या’ या पहिला पाऊस पडल्या, पडल्या ऋतूसंधीच्या काळात उगवतात ज्यात कुठलीही खतं, किटकनाशक नसतात व आपल्या शरीरात गेलेली विषारी रसायन त्या बाहेर काढतात. हा निसर्गाने दिलेला उपहार आहे. टाकळा, पुनर्नवा, वरधारा, फोडशी, मायाळू, चाई, करटूले, भारंगी,अशा भाज्या आपल्या खाण्यात असतात पण या भाज्या कशा ओळखायच्या, ?

त्यांचे औषधी गुणधर्म काय आहेत या विषयी या प्रकल्पाच्या प्रमुख व तळेगावातील (Talegaon) सुप्रसिद्ध वैद्य डॉं.ज्योती मुंडर्गी यांनी सुंदर प्रेझेंटेशन च्या सहाय्याने माहिती दिली. रो.मथुरे यांनी आपल्या सुंदर छायाचित्राच्या क्लिपिंग द्वारे सर्वांना खरपुड गावची सफर घडवून आणली .

खरपुडे या आपल्या सह्याद्रीच्या कुशीतल्या आदिवासी गावातल्या १५ महिलांनी डोंगरावरुन गोळा केलेल्या विविध रानभाज्यांच्या रुचकर आस्वाद आज तळेगावातील लोकांना घेता आला..हातसडीच्या तांदळांचा पौष्टिक आणि रुचकर भात, बाजरी, वरई, नाचणी आणि तांदळाच्या भाकऱ्या आणि १५ प्रकारच्या चविष्ठ भाज्या, विविध कंद यांचा आस्वाद सगळ्यांना घेता आला. मन आणि उदर दोन्हीही तृप्त झाले.

आपल्या आदिवासी समाजाने सांभाळलेला हा रान मेवा, ही संस्कृती आपण जतन केली पाहिजे, जे सांभाळतात त्यांचा सन्मान करायला हवा असे मनोगत डॉ.गणेश सोरटे यांनी व्यक्त केले.

ईश्वर निर्मित सर्व वस्तू या उपयोगाच्या असतात पण त्याचा उपयोग आपण करून घ्याला हवा…असे मनोगत या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले हा.भ.प.शेखर महाराज जांभूळकर यांनी व्यक्त केले.

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे चे विद्यमान अध्यक्ष, उद्योजक मा.उद्धव चितळे यांनी रोटरी क्लब च्या कार्याविषयी माहिती दिली आणि रोटरी अश्याप्रकारच्या उपक्रमाला नेहमीच सहाय्य करेल असे सांगितले. खरपुड गावचे सरपंच सुभाष म्हसे आणि तानाजी भोगटे यांनी या उपक्रमात महत्वाचे योगदान दिले.

डॉ. गणेश सोरटे यांच्या आईच्या स्मरणार्थ त्यांनी खरपुड गावाच्या रानभाज्या गोळा करून, त्यांचा चविष्ट आस्वाद देणाऱ्या १५ महिलांचा साडी आणि श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.

हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी वैद्य डॉ. ज्योती मुंडरगी आणि आयुर्वेद व्यासपीठच्या, वैद्य लता, कीर्ती जाधव, वैद्य प्रणाली, कासवा वैद्य, अपूर्वा मुंडर्गी, वैद्य कोमल गायकवाड, रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडेचे अध्यक्ष रो.उद्धव चितळे आणि सदस्य आणि फ्रेंड्स ऑफ नेचर चे सुधाकर मोरे, नीरज शाही यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी पुणे,कोथरूड,पिंपरी चिंचवड येथील वैद्य, रोटरियन्स, निसर्ग प्रेमी उपस्थित होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.