PCMC : रस्त्यावरील खड्डे बुजवा; जनसंवाद सभेत मागणी

एमपीसी न्यूज – रस्त्यावरील खड्डे लवकर बुजविण्यात (PCMC) यावेत. डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी फवारणी करण्यात यावी, पाणीपुरवठा पुरेशा दाबाने करावा अशा विविध मागण्या नागरिकांनी जनसंवाद सभेत केली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आणि आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या आदेशानुसार प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन सर्व क्षेत्रिय कार्यालयांमध्ये करण्यात येते. आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी सहभाग घेऊन एकूण 52 तक्रारवजा सूचना मांडल्या. यात अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अनुक्रमे 8,5, 3,5,4,10,8 आणि 9 तक्रारवजा सूचना नागरिकांनी उपस्थित राहून मांडल्या.

अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या क्षेत्रीय कार्यालयांच्या जनसंवाद सभेचे अध्यक्षपद मुख्य समन्वय अधिकारी असलेले अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे, अजय चारठाणकर यांनी भूषविले. तसेच यावेळी क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.

रस्त्यावरील खड्डे लवकर बुजविण्यात यावेत या तक्रारीचा प्रामुख्याने समावेश होता. तसेच उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, शहर परिसरात वेळोवेळी किटकफवारणी (PCMC) करण्यात यावी, रस्त्यावरील अनधिकृत फळविक्रेते, हातगाड्या तसेच उभारण्यात आलेले अतिक्रमण काढावेत, डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी फवारणी करण्यात यावी, पाणीपुरवठा पुरेशा दाबाने करावा, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डीपी वरील झाकणे दुरुस्त करणे, खराब झालेल्या ड्रेनेज लाईन्स दुरूस्त करण्यात याव्यात अशा तक्रारींचाही समावेश होता.

PMPML : रक्षाबंधन सणानिमित्त प्रवाशांसाठी पीएमपीएमएलकडून जादा बसेसचे नियोजन

सभेचे अध्यक्ष तथा मुख्य समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेल्या महापालिका क्षेत्रीय कार्यालयात उपस्थित राहून नागरिकांना महापालिकेच्या अनुषंगाने असलेली कामे, अडचणी, तक्रारी, सूचना या सर्व बाबींची नोंद घेऊन संबधितांना या बाबतीत कार्यवाही करण्याच्या सूचना महापालिकेकडून दिल्या गेल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.