PMPML : रक्षाबंधन सणानिमित्त प्रवाशांसाठी पीएमपीएमएलकडून जादा बसेसचे नियोजन

एमपीसी न्यूज – पुणे व पिंपरी-चिंचवड  (PMPML) शहरातील नागरिकांसाठी बुधवार (दि.30) रक्षाबंधन सणानिमित्त परिवहन महामंडळामार्फत मार्गावर धावणाऱ्या दैनंदिन बस संख्येपेक्षा जादा बसेस उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

दरवर्षी रक्षाबंधन’च्या दिवशी मोठ्या संख्येने प्रवासी वर्ग प्रवास करीत असतो. यासाठी दरवर्षी प्रमाणे परिवहन महामंडळाने रक्षाबंधनच्या दिवशी प्रवाशांची जास्तीत जास्त सोय होण्यासाठी दैनंदिन संचलनात असलेल्या नियोजित 1 हजार 837 बसेस व्यतिरिक्त जादा 96 बसेस अशा एकूण 1 हजार 933 बसेसचा ताफा महामंडळाकडून मार्गावर उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे.

सदरील जादा बसेस या गर्दीच्या मुख्य बस स्थानकावरून कात्रज, चिंचवड, निगडी, सासवड, हडपसर, वाघोली, जेजुरी, आळंदी, भोसरी, तळेगांव, राजगुरूनगर व देहूगाव इत्यादी ठिकाणी सोडण्यात येणार आहेत.

PMPML : खासगी ठेकेदाराच्या चालकांनी पुकारलेला संप मागे

याकरिता वाहक, चालक, पर्यवेक्षकीय सेवक यांच्या साप्ताहिक सुट्टया रद्द करण्यात आलेल्या आहेत. तसेच महत्वाच्या (PMPML) स्थानकावर बस संचलन नियंत्रणासाठी अधिकाऱ्यांच्या नेमणूका करण्यात आलेल्या आहेत.

यामुळे 30 व 31 ऑगस्ट या दिवशी जादा बसेसचे नियोजन केलेले आहे. तसेच महामंडळाकडील अधिकारी, लिपीक व इतर कर्मचारी यांची महत्वाच्या स्थानकांवर प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी व वाहतूक नियंत्रण करण्यासाठी नेमणूक करण्यात आली आहे.

तरी पीएमपीएमएलकडून बुधवार रक्षाबंधन या सणाच्या दिवशी उपलब्ध करण्यात आलेल्या जादा बसेसची नोंद घेवून जास्तीत जास्त प्रवासी नागरिकांनी सार्वजनिक प्रवासी वाहतूक बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.