PMPML : खासगी ठेकेदाराच्या चालकांनी पुकारलेला संप मागे

एमपीसी न्यूज – ट्रॅव्हलटाईम या (PMPML) खासगी बस ठेकेदाराकडील कोथरूड, पुणे स्टेशन व वाघोली डेपोतील इलेक्ट्रिक व सीएनजी बसेस वरील कंत्राटी चालकांनी पुकारलेला संप मागे घेतला. कोथरूड डेपोकडील कंत्राटी चालकांनी शनिवार (दि.26 ) संप मागे घेतला तर पुणे स्टेशन व वाघोली डेपोकडील कंत्राटी चालकांनी रविवार(दि.27) दुपारनंतर संप मागे घेतला.

खासगी बस ठेकेदाराकडील कंत्राटी चालकांनी पुकारलेल्या संपाचा पीएमपीएमएलच्या बससेवेवर कोणताही परिणाम होवू नये यासाठी पीएमपीएमएल प्रशासनाने महामंडळाकडील चालक खासगी बसेसवरती नेमून प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेतली होती.

ट्रॅव्हलटाईम या खासगी बस ठेकेदाराकडील चालकांनी अचानक पुकारलेल्या संपामुळे पुणेकरांची गैरसोय होऊ नये म्हणून पुणे महानगर परिवहन महामंडळाकडील सर्व अधिकारी कार्यालयीन कर्मचारी, वाहक व चालक यांच्या असलेल्या साप्ताहिक सुट्ट्या रद्द करून महामंडळाकडून नियमित मार्गस्थ होणारे जवळपास सर्व शेड्युल मार्गस्थ करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.

Pimpri : बहुउद्देशीय प्रकल्पाचा आराखडा तयार करा; कामगार मंत्री डॉ. खाडे यांचे निर्देश

खासगी बस ठेकेदाराकडील कंत्राटी चालकांच्या संपामुळे पीएमपीएमएलच्या बससेवेवर फारसा परिणाम झाला नसल्याचे पीएमपीएमएलने सांगितलं आहे.

दरम्यान रविवार (दि. 27) दुपारपासूनच पीएमपीएमएलची (PMPML) बससेवा पूर्वपदावर आलेली आहे. तसेच सोमवार (दि. 28) प्रवाशी नागरिकांच्या सोयीसाठी एकूण 1 हजार 801 बसेस मार्गावर संचलनात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.