Alandi : एम.आय.टी. महाविद्यालयात “उद्योजकतेमध्ये बौद्धिक संपदा संचालन करणे व नवकल्पकांना सक्षम करणे “बाबत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

एमपीसी न्यूज – आळंदी (Alandi) एम.आय.टी. कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयतील स्टार्ट -अप आणि इनोव्हेशन सेल व  इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिलने 21 ऑगस्ट  रोजी जागतिक उद्योजकता दिन निमीत्त  “उद्योजकतेमध्ये बौद्धिक संपदा संचालन करणे व नवकल्पकांना सक्षम करणे ” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन  करण्यात आले होते.

Pimpri : बहुउद्देशीय प्रकल्पाचा आराखडा तयार करा; कामगार मंत्री डॉ. खाडे यांचे निर्देश

या कार्यशाळेत अधिवक्ता कुणाल सरपाल ( ट्रेडमार्क आणि पेटंट अ‍ॅटर्नी) यांनी विद्यार्थ्यांना  नवीन उद्योजकतेला  चालना देण्यासाठी आणि उद्योजकीय यश मिळवण्यात बौद्धिक संपदेची भूमिका व धोरणे समजून घेण्याच्या आणि प्रभावीपणे कश्या वापराव्यात या बदल मार्गदर्शन केले. उद्योजकतेमध्ये बौद्धिक संपदा महत्त्वाची का आहे?

व्यवसायात बौद्धिक संपदेचे महत्त्व व बौद्धिक संपदा हा व्यवसाय धोरणाचा एक महत्त्वाचा पैलू आहे आणि व्यवसायांनी त्यांच्या आयपीचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक पावले उचलली पाहिजेत. बौद्धिक संपदा संरक्षण स्पर्धात्मक फायदा देऊ शकते, गुंतवणूकदारांना आकर्षित करू शकते, महसूल निर्माण करू शकते, ब्रँड प्रतिष्ठा निर्माण करू शकते आणि कायदेशीर संरक्षण प्रदान करू शकते.

उद्योजकतेमध्ये  विविध पैलूंचा समावेश आहे, जसे की स्टार्टअप्स, तंत्रज्ञान उपक्रम, सर्जनशील उद्योग आणि बरेच नवीन संकल्पन या विषयावर कार्यशाळायेतुन विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती मिळाली. ही कार्यशाळा आयआयसीचे अध्यक्ष व प्राचार्य डॉ. बी.बी. वाफरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कार्यशाळेचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा.अक्षदा  कुलकर्णी यांनी केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.अभिजित नेटके यांनी केले. (स्टार्ट-अप आणि इनोव्हेशन सेल प्रमुख आणि IIC संयोजक) , विद्यार्थी समन्वयक विघ्नेश दासगावकर यांनी  आभारप्रदर्शन केले.  या कार्यक्रमात एकूण 160 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. डॉ. अमोल माने, डॉ. अर्चना आहेर, प्रा. आकांशा लांडगे, प्रा. संजय गुंजाळ, प्रा. वसंत करमाड, प्रा. कविता महाजन, प्रा. श्रीराम करगावकर यांनी कार्यशाळेचे यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य केले. याबाबत माहिती राहुल बाराथे यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.