Talegaon Dabhade : रोटरी सिटीच्या पिंकेथॉनमध्ये महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी आणि तळेगाव दाभाडे नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित (Talegaon Dabhade) केलेल्या पिंकेथॉनमध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. राज्यस्तरीय मल्लखांबपटू गार्गी देशमाने हिने मल्लखांबाचे प्रात्यक्षिक दाखवले. कार्यक्रमात मावळ केसरी पै.सनम शेख व कुस्तीपटू ईश्वरी झिंजुरके यांचा सन्मान करण्यात आला. स्लोगन स्पर्धा आणि लकी ड्रॉच्या विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.

याप्रसंगी DRR रो सिद्धेश गायकवाड, रोटरी सिटीचे अध्यक्ष रो सुरेश शेंडे, उपाध्यक्ष रो किरण ओसवाल,सचिव रो भगवान शिंदे,रोटरेक्टचे अध्यक्ष हर्षद जव्हेरी,रो दीपक फल्ले,रो दिलीप पारेख,रो विलास काळोखे,रो संजय मेहता,रो प्रदीप मुंगसे,रो राकेश गरुड,रो संतोष परदेशी हे उपस्थित होते.

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीने आयोजित केलेल्या व तळेगाव दाभाडे नगरपरिषद व रोटर क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीने सहयोग केलेल्या रोटरी सिटी पिंकीथॉनला तळेगाव दाभाडे शहर व पंचक्रोशीतील महिलांनी अभूतपूर्व असा प्रतिसाद दिला. 1000 महिलांनी आपला सहभाग नोंदवला होता.यावर्षी या पिंकेथॉनचे दुसरे वर्ष असून रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 च्या डिस्टिक गव्हर्नर रोटरियन मंजू फडके यांच्या शुभहस्ते झेंडा फडकवून या पिंकेथाॅनची  सुरुवात करण्यात आली.

PCMC : महापालिकेने महावितरणचे 1 कोटी थकवले

डी रो मंजू फडके यांनी रोटरी क्लब तळेगाव दाभाडे सिटी ने घेतलेल्या या उपक्रमाचे कौतुक करून रोटरी सिटीने महिलांसाठी असे नाविन्यपूर्ण उपक्रम घ्यावेत असे आवाहन केले. तळेगांव दाभाडेची कन्या कु.गार्गी ईश्वर देशमाने या राज्यस्तरीय मल्लखांबपटू हिने दाखवलेले अविस्मरणीय असे मल्लखांबाचे प्रात्यक्षिक हे आजच्या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते.तसेच मावळ केसरी पैलवान सनम समीर शेख व कुस्तीपटू ईश्वरी मोहन झिंजुरके यांचा सन्मान रोटरी सिटीच्या वतीने करण्यात DG मंजू फडके यांच्या हस्ते करण्यात आला.

तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे अधिकारी यांनी माझी वसुंधराची शपथ सर्व महिलांना (Talegaon Dabhade) दिली व तळेगाव शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी आपण सहकार्य करावे अशी विनंती केली.

“सशक्त नारी,सशक्त भारत” या घोषवाक्यावर वेगवेगळे स्लोगन करून घेऊन आलेल्या स्पर्धकांमध्ये प्रथम क्रमांक सुनीता जोशी,द्वितीय क्रमांक रूपाली दाभाडे व तृतीय क्रमांक रिद्धी पोतदार यांनी पटकावला.याच उपक्रमामध्ये ठेवलेल्या लकी ड्रॉ मध्ये मानाच्या दोन संकेत पैठणी प्रथम क्रमांक दिव्या पाटील यांना तर द्वितीय क्रमांक सोनाली प्रधान यांना मिळाला.

तसेच पल्लवी भाटिया व अनुजा भालेराव यांना चांदीचा छल्ला व चांदीची करंडा मिळाला तर एक्वा पुरिफायर कावेरी पाटील यांना मिळाला.अनुशा मुरल,अंकिता वाजे, अलका आर्या,सृष्टी मानकर,शगुन कुल,नंदिनी साबळे,काजल मडगे, संध्या वाळुंज,सृष्टी कुंभार यांना सुद्धा लकी ड्रॉ मध्ये बक्षिसे लागली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉक्टर धनश्री काळे यांनी केले तर आभार किरण ओसवाल यांनी मानले.

सदर कार्यक्रमाचे नियोजन शरयू देवळे,स्वाती मुठे,सुनंदा वाघमारे, कमल ढमढेरे,वर्षा खारगे,निखिल महापात्रा,प्रशांत ताये,प्रदीप टेकवडे, वैभव तनपुरे,रितेश फाकटकर व सर्व रोटरी मेंबर्सनी (Talegaon Dabhade) केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.