Chinchwad :  वाल्हेकरवाडीत महापालिकेने उभारले फूड कोर्ट

एमपीसी न्यूज –  वाल्हेकरवाडी येथील महापालिकेकडून गुरुद्वाराजवळ ( Chinchwad) फुडकोर्ट उभारण्यात आले आहे. येथे खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी 49 गाळ्यांची सोय केलेली आहे. सध्या येथे विद्युतविषयक काम सुरु आहे. भूमी व जिंदगी विभागाकडून या गाळ्यांचे वितरण केले जाणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडून फूट कोर्टमधील गाळे उभारल्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी भूमी आणि जिंदगी विभागाकडे सोपविले आहे. आता पुढील कार्यवाही भूमी जिंदगी विभागामार्फत होणार आहे. विद्युतविषयक काही कामे बाकी आहेत. तसेच, बांधकाम पुर्णत्व दाखल्यासाठी आवश्यक कार्यवाही पूर्ण केली जात आहे. फुडकोर्ट उभारण्याची कार्यवाही जुलै 2023 मध्ये सुरु करण्यात आली. गेल्या नऊ महिन्यांमध्ये गाळे उभारण्याचे काम पूर्ण झाले. स्थापत्य आणि विद्युतविषयक कामांसाठी एकूण 4 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.

Talegaon Dabhade : रोटरी सिटीच्या पिंकेथॉनमध्ये महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दीड एकर क्षेत्रात फूडकोर्टची उभारणी, प्रत्येक गाळा 10 फूट बाय 15 फूट आकाराचा, पाणीपुरवठा, वीजपुरवठ्याची सोय,  वाहनांसाठी पार्किंगची सोय,  महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, नागरिकांना बसण्यासाठी व्यवस्था, वृक्षारोपण फूडकोर्टचे स्थापत्यविषयक काम पूर्ण झाले आहे.  सध्या विद्युतविषयक काम बाकी आहे. त्याचप्रमाणे, बांधकाम पुर्णत्व दाखला घेण्याची कार्यवाही  सुरु आहे. फुडकोर्टमधील गाळ्यांच्या वितरणाची पुढील कार्यवाही भूमी आणि जिंदगी विभागामार्फत केली जाणार आहे. हे गाळे उभारण्यामागे प्रामुख्याने खाऊगल्लीची संकल्पना असल्याचे कार्यकारी अभियंता अनिल शिंदे यांनी ( Chinchwad)  सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.