Alandi : बेकायदेशीररीत्या हातभट्टी चालवणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – बेकायदेशीर रित्या हातभट्टी चालवणाऱ्या महिले विरोधात (Alandi) आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट तीन यांनी मरकळ येथील कांंजारभाट वस्ती येथे शुक्रवारी (दि.5) केली.

याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हे शाखेचे पोलीस शिपाई योगेश्वर कोळेकर यांनी फिर्यादी असून महिले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chinchwad : आम्ही दीड वर्षांपूर्वी केलेल्या प्रयोगाची इतिहासात नोंद होईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला बेकायदेशीर रित्या दारू भट्टी चालू होती. (Alandi) यावेळी पोलिसांनी कारवाई करून तिच्याकडून तब्बल 2 लाख रुपयांचे दारू बनवण्याचे 4 हजार लिटर कच्चे रसायन जप्त करण्यात आले. आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.