Alandi : आळंदीकरांची चिंता मिटली; डोळे लागण रुग्णसंख्येत घट

एमपीसी न्यूज : आळंदीत पसरलेल्या डोळे लागण साथीचा आता (Alandi)वेग कमी झाला असून डोळे लागण रुग्ण संख्येत घट झाली आहे. त्यामुळे आळंदीकरांची चिंताही कमी झाली आहे.

दि.11 ऑगस्ट रोजी आळंदीमध्ये डोळे लागण रुग्णांच्या संख्येत पुन्हा घट झालेली दिसून आली. 11 ऑगस्ट पर्यंतची एकूण सर्वे केलेली संख्या 403499 एवढी आहे.

Today’s Horoscope 12 August 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

तर यामध्ये नवीन 80 रुग्णांची भर झाली आहे. आत्तापर्यंत बाधित (Alandi) रुग्ण संख्या 10154, आत्तपर्यंतचे बरे झालेल्यांची संख्या 9493 इतकी आहे.

याबाबतची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. उर्मिला शिंदे यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.