Alandi: अशोकराव खांडेभराड यांची शिवसेना(ठाकरे गट) पक्षाच्या पुणे जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती झाल्याबदल युवासेना शाखेच्या वतीने सत्कार

एमपीसी न्यूज –  आज  4 फेब्रुवारी  रोजी आळंदी शहर शिवसेना युवासेना (Alandi)व महिला आघाडीच्या वतीने नुकतीच शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पुणे जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती झालेल्या लोकनेते  अशोकराव खांडेभराड  यांचा संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांची प्रतिमा देऊन शिवतेज मंगल कार्यालय आळंदी देवाची येथे भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी खेड आळंदी नगरपरिषद निवडणूक समन्वयक म्हणून नियुक्ती झालेल्या जेष्ठ शिवसेना नेते मा .तालुकाप्रमुख  उत्तमदादा गोगावले यांचा व खेड आळंदी विधानसभा  निवडणूक समन्वयक पदी नियुक्ती झालेल्या मा. उपसभापती पंचायत समिती खेड   अमोल पवार यांचा देखील सत्कार करण्यात आला.
यावेळी नवनिर्वाचित शिरूर जिल्हा उपसंघटक शिवसेना महिला आघाडीच्या जेष्ठ नेत्या  अनिता झुजम व विभाग संघटक योगिता धुमाळ यांचा जिल्हाप्रमुख  अशोकराव खांडेभराड व  अमोल पवार (मा .उपसभापती पंचायत समिती खेड) यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी अमोल पवार यांनी खेड मध्ये नव्याने सुरू होणाऱ्या शिवसेना पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या कामाची माहिती दिली. तसेच नवीन तरुणांना पक्षाच्या कामासाठी उर्जा देणारे मार्गदर्शन पर भाषण केले.

जेष्ठनेते  रामहरी आवटे,  उत्तम गोगावले,  अनिता  झुजम, (Alandi)योगिता  धुमाळ यांनी देखील उपस्थिताना मार्गदर्शन पर भाषण केले व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
यावेळी नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख लोकनेते  अशोकराव खांडेभराड यांनी उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकारी यांना पुढे येऊ घातलेल्या लोकसभा , विधानसभा, व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीला मोठ्या ताकदीने सामोरे जाण्याचे व जास्तीत जास्त शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या जागा निवडून आणण्याचे आवाहन केले.

 आळंदी शहर संघटक जेष्ठ शिवसेना नेते मा नगरसेवक  आनंदराव मुंगसे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शहरप्रमुख  अविनाश तापकीर ,युवानेते  आशिष गोगावले, उपशहर प्रमुख श्री शशिकांत जाधव,  मंगेश तिताडे,  राहुल सोमवंशी, युवासेना शहर प्रमुख  मनोज पवार ,उपशहर प्रमुख  निखिल तापकीर, चारुदत्त रंधवे, समन्वयक  अनिकेत डफळ,  राकेश जाधव , राहुल गोरे , निलेश वाबळे,   अशोक गरड  ,विभाग संघटक  योगिता धुमाळ, भारती वाघमारे , कांता शिरसाट , लता अडगळे ,  जानवी मालक , सविता कांबळे, आरती लोहार व सर्व शिवसेना आजी – माजी पदाधिकारी, युवा सेना, महिला आघाडी व सुसंगत अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी व कट्टर शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.याबाबत माहिती चारुदत्त रंधवे यांनी दिली.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.