Alandi: ज्ञानोबा तुकोबा झरा आपल्या मुलांच्या अंतःकरणात गेला पाहिजे-गोविंदगिरी महाराज

एमपीसी न्यूज – Govinddev Giri Maharaj, 75th Birthday, Gita Bhakti Amrit Mahotsav, organized by Warkari Education Instituteआळंदी येथे गोविंददेव गिरी महाराज (Alandi)यांच्या 75 व्या वाढदिवसा निमित्त गीताभक्ती  अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 4 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी पर्यंत (चाकण चौक )वारकरी शिक्षण संस्थेसमोर हे आयोजन करण्यात आले आहे.

या निमित्ताने आजच्या पत्रकार परिषदेत गोविंदगिरी महाराज म्हणाले विश्वाच्या सर्व विषयांवर विचार करता आणि मानवी कल्याणाच्या दृष्टीने विचार करता एक गोष्ट निर्विवाद  आहे.संपूर्ण विश्वाचे कल्याण पाहिजे असणारी संस्कृती म्हणजे भारतीय संस्कृती,वैदिक संस्कृती आहे.ज्ञानेश्वर महाराजांचे पसायदान आहे.
त्या पसायदाना मध्ये माउलींनी काय मागितले? कोणा करिता मागितले?(Alandi)व्यक्ती स्वतः करता मागतो,घरा करता मागतो,जाती करता मागतो,समजा करता मागतो,देशा करता मागतो,माउलींनी म्हटलं आतां विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे,तोषोनि मज द्यावे, पसायदान हे|| किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित || ज्या भूमी मध्ये राहतो ती भूमी,विश्वाचे कल्याण कसे होईल?या विश्वाचे कल्याणाचे दिवस रात्र चिंतन करणारे  हे माऊली आहेत.लहान पणापासून अभ्यास केला असता, सर्व विश्वाचे विचार पाहिले,योगीना जाणले,महायोगी मध्ये उपस्थित राहण्याचे प्रयत्न केले,माझ्या अंतःकरणात एक भावना दृढ झाली संपूर्ण विश्वाचा (विश्व कल्याणाचा) विचार करता ज्ञानेश्वर महाराजां सारखी विभूती आहे. ती हिंदू धर्मात आहे.आम्हाला सर्वां बद्दल आस्था आहे.ज्ञानेश्वर महाराज सर्वांना एकत्रित घेऊन चालतात,ही त्यांची विशेषतः आहे.ती समन्वयाची भूमी आहे.आज विश्वाला समन्वयाची आवश्यकता आहे.आता मानवता आवाज देत आहे. कारण आपण कधी जाती वर बोलतो,धर्मावर बोलतो,कधी देशावर बोलतो,भाषेवर बोलतो तुकड्या तुकड्या मध्ये विभागणी करत आहोत.एकमेकांचे गळे दाबायला पाहातो.
ही संजीवन समाधी त्या महात्माची समाधी आहे ज्याने अनेक अत्याचार सहन केले.ते सहन करताना एक ही कठोर शब्द त्यांच्या कडून निघाले नाहीत.थोडेसे जरी सहन करावे लागले तरी काहींच्या वाणीतून कडूता येते.त्या कडूतेचे आपण समर्थन करतो.पण इतके सहन करून ज्ञानेश्वरांच्या वाणीतून कडूता आली नाही.माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके।ऐसी अक्षरे रसिके मिळविन।असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात.
संकीर्णता त्यांना स्पर्श करत नाही.ते देशाचा विचार करत नाही,भाषेचा विचार करत नाही,प्रांताचा  विचार करत नाही.परिवाराचा करत नाही,संपूर्ण जगाचा विचार करणारा महात्मा यांची संजीवन समाधी  येथे विराजमान आहे.
उत्सव साजरा करायचा आहे असे मला  सांगितले असता तेव्हा त्यांना सांगितले मी 7 दिवस आळंदीत राहू इच्छितो.येथे श्रीमदभागवत ग्रंथ ऐकू इच्छितो.श्रीमद भागवत गीते वर माझे प्रेम आहे.श्रीमदभागवत गीते मुळे भक्तीचा प्रमाण बनवला आहे, प्रवाहित केला  आहे . त्या प्रमाणे सर्व संतांनी समाज एकत्रित केला.भक्ती कोठून येते.श्रीमद भागवत मधून येते.भक्ती भागवत आहे भागवत ही भक्ती.यामुळे मी श्रीमदभागवतेचे आळंदीत श्रवण करू इच्छितो.
समाजा मध्ये समाजाची सेवा करणारी अनेक लोक आहेत.ज्यांनी संपूर्ण जीवन देशाच्या सेवेत,धर्माच्या सेवेत,समाजाच्या सेवेत लावले.कोणत्याही अपेक्षे शिवाय घालवले. मी म्हणालो त्यांना बोलवा त्यांचा सन्मान करा.यामुळे प्रसन्नता वाटेल.त्यांच्या मध्ये मला मी पाहतो.त्यांचा सन्मानाला माझा सन्मान मानतो.अशी लोक शोधणे त्यांच्या सन्मान करणे माझी इच्छा आहे.मानव कल्याणा करिता वेदांचे सिद्धांत उपयोगी आहेत.आपले योग,आयुर्वेद ,संगीत  सर्वांसाठी आहेत.राम मंदिराची स्थापना झाली आपल्या देशातील मदरश्या चे प्रमुख आहेत. त्यांनी सांगितले प्रत्येक मदरश्या मध्ये रामाचे चरित्र शिकवले पाहिजे.कारण राम हा खरा आदर्श आहे.मूळ गोष्ट ही आहे की वैदिक परंपरेचे सिद्धांत सांगितले ते सिद्धांत कोणत्याही एका जाती धर्मा भाषा संप्रदया करिता नाहीतर मानवते करता आहे.

महाराष्ट्र हा महा राष्ट्रच आहे. महाराष्ट्र हा जो पोसला गेला तो संतांच्या विचारांवर पोसला गेला.सगळ्या संतांच्या विचारांची गंगोत्री ही आळंदी आहे.ज्ञानोबा तुकोबा झरा आपल्या मुलांच्या अंतःकरणात गेला पाहिजे.प्रत्येक बालकाच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद निर्माण व्हावेत.तसेच त्यांचे संस्कार आपल्या मध्ये यावेत.
तसेच त्यांनी धर्म अंग व धार्मिक जीवन मूल्य याची माहिती दिली.व संस्कार निर्मिती उपक्रमाची माहिती दिली.
 तसेच ज्याप्रमाणे शांततेत अयोध्येत श्रीराम मंदिर झालं त्याचप्रमाणे ज्ञानवापीबाबत पक्षकार मुस्लिम बांधवांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी. मशीद दुसरीकडे करावी, असे आवाहन गोविंदगिरी यांनी केले आहे. यावेळी त्यांनी काशी विश्वनाथ मंदिर आणि मथुरेतील श्रीकृष्ण मंदिराबाबत विधान केले.
या दोन्ही मंदिरांसाठी आम्ही आग्रही असून दोन्ही मंदिरे पूजा करण्यासाठी उपलब्ध करावीत. तसं सध्या अनुकूल वातावरण असल्याचं गोविंद गिरी महाराज यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितलं आहे.
यावेळी गीता परिवाराचे सदस्य संजय मालपाणी,गिरीधर काळे ,आशु गोयल,शेखर मुंदडा हे उपस्थित होते.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.