Chinchwad : वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करा – विवेक पाटील

पीसीसीओईआर मध्ये 'वाहतूक व्यवस्थापन' विषयावर परिसंवाद

एमपीसी न्यूज – विद्यार्थ्यांनी जीवनास आकार देत असताना (Chinchwad)जबाबदारीचे भान ठेवून वागले पाहिजे. त्याचप्रमाणे वाहन चालविताना वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे.

वाहनांचा कमीत कमी आणि गरजेनुसार वापर करावा. प्रदूषणाबाबत जागरूक राहावे. वेगावर नियंत्रण ठेवून सुरक्षित वाहन चालवावे.‌ आपले जीवन अत्यंत मौल्यवान असून राष्ट्र उभारणीत त्याचे योगदान द्यावे, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेचे उपायुक्त विवेक पाटील यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग ॲण्ड रिसर्च, (पीसीसीओईआर) येथे ‘वाहतूक व्यवस्थापन’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पोलीस उपायुक्त पाटील यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची माहिती देऊन मार्गदर्शन केले. यावेळी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे, प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, प्रबंधक प्रकाश येवले, प्रा. अनिल काटे, डॉ. राहुल मापारी, डॉ. सुदर्शन बोबडे आदी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड शहरात गेल्या पाच वर्षात झालेल्या अपघातांमध्ये मृत्यू पावलेल्या नागरिकांमध्ये 70 टक्के तरुण होते. तर 75 टक्के अपघात व्यसनाधीनतेमुळे झाले आहेत. हे पाहणीतून समोर आले आहे, असे सुनील टोणपे यांनी सांगितले. जबाबदारीने वाहन चालवून वेगावर नियंत्रण ठेवले पाहिजे. रस्त्याच्या बाजूला अथवा महामार्गावर वाहन चालकांसाठी सूचना दिलेल्या असतात त्याचे पालन करा.

Alandi: श्री ज्ञानेश्वर विद्यालयाचा क्रीडा स्पर्धेत भाग

शहरात अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. त्यामुळे नियम भंग करणारा पोलिसांच्या नजरेतून सुटू शकत नाही. नियम भंग करू नका आपल्या घरी आपली कुणीतरी वाट पाहत आहे. आपण सुखरूप घरी पोहोचले पाहिजे याचे भान ठेवा. बेजबाबदारपणे वाहन चालूवून यमदूतास अवेळी बोलावू नका, असे टोणपे यांनी सांगितले.

यावेळी डॉ. राहुल मापारी, डॉ. सुदर्शन बोबडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा अनिल काटे यांनी आभार मानले. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.