Alandi: श्री ज्ञानेश्वर विद्यालयाचा क्रीडा स्पर्धेत भाग

एमपीसी न्यूज – जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ (JSPM) पुणे संचलित JSPM कॉलेज वाघोली पुणे, (Alandi)यांचे वतीने आयोजित 1 व 2 फेब्रुवारी  रोजी संपन्न झालेल्या ‘मल्हार करंडक’ खो – खो स्पर्धेमध्ये श्री ज्ञानेश्वर विद्यालय आळंदी देवाची येथील खेळाडू विद्यार्थ्यांनी वयोगट 17 मुले या मध्ये व्दितीय क्रमांक पटकावून यश संपादन केले. विजेता संघास ट्रॉफी, प्रमाणपत्र, रोख तीन हजार रूपये देऊन सन्मान करण्यात आला.
तसेच वेदांत परदेशी या विद्यार्थ्याने वयोगट 17 मुले या मध्ये बुद्धिबळ स्पर्धेत (Alandi)तृतीय क्रमांक मिळविला. विजेत्या खेळाडूस ट्रॉफी, प्रमाणपत्र, रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला.

Nigdi : शेअर्स खरेदीच्या बहाण्याने व्यावसायिकाची 23 लाख 40 हजारांची फसवणूक

या सर्व विजयी खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षक क्रिडा विभाग प्रमुख श्रीरंग पवार, राजश्री भुजबळ, येडबा कांबळे, प्रकाश पवार यांचे संस्थेचे सचिव अजित वडगावकर, प्राचार्य दिपक मुंगसे, उपमुख्याध्यापक सूर्यकांत मुंगसे, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी  अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .

 

 

https://www.youtube.com/watch?v=A6PKesL31Ts&ab_channel=MPCNews

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.