Alandi News : इंद्रायणीनगर परिसरा मधील स्वच्छता मोहिमेत स्वच्छ शहर, सुंदर शहराचा संदेश

एमपीसी न्यूज : आळंदी शहरा मधील इंद्रायणी नदी व इंद्रायणीनगर परिसरामध्ये स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. (Alandi News) आळंदीत ‘स्वच्छ शहर, सुंदर शहराचा’ संदेश देण्यात आला.

यावेळी पुणे जिल्हा शिक्षण मंडळांचे मा. मानद सचिव के.के.निकम सर, माजी उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले, विवेकानंद महाराज गिरी, संतोष वायाळ, सागर साठे, महेश महाराज मडके, अभिषेक पवार, सुदाम सरगर, शुभम जाधव, अजय रसाळ व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Pimpri News : महाराष्ट्र केसरी निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत संकेत चव्हाण, प्रसाद सस्ते विजयी

स्वच्छतेची मोहिम राबवताना पर्यावरण संवर्धानालाही तितकेच महत्व दिले पाहिजे. झाडां इतके जगात कोणीही मोठे नाही. त्यामुळे झाडे लावा, झाडे जगवा असा संदेश के.के.निकम सर यांनी दिला. (Alandi News) आपल्याकडे कचरा करणारे जास्त असून कचरा उचलणारे कमी आहेत, इथेच खरा घोळ आहे अशी टिप्पणी ही त्यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.