Alandi Diwali : दिवाळीसाठी आळंदीच्या बाजारपेठा सज्ज

एमपीसी न्यूज : दिवाळी (Alandi Diwali) सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यानिमित्त आळंदीतील विविध ठिकाणी असलेल्या बाजारपेठा सजून गेल्या आहेत. दिवाळीनिमित्त रस्त्याच्या कडेने तात्पुरत्या स्वरूपात असलेल्या दुकानांमध्ये, आकर्षक अशा मातीच्या पणत्या, लक्ष्मी पूजनासाठी लक्ष्मी मूर्ती, केरसुणी(लक्ष्मी), लक्ष्मी पूजन झाल्यानंतर लाह्या बत्ताश्याचे प्रसादाचे पुडे, विविध रंगातील रांगोळी पुडे व इतर विविध वस्तू खरेदीसाठी नागरिक येथे येत आहेत.

दिवाळीच्या सुट्टीत किल्ला बनवण्याचे आकर्षण मुलांमध्ये अजूनही टिकून असल्याने सिंहासनावर विराजमान असलेले छत्रपती शिवाजी महाराज, पहारा देणारे मावळे, गवळणी, गावातल्या बलुतेदारांबरोबरच जंगलातल्या लहान मोठ्या प्राणीपक्षांच्या रेखीव चित्रांच्या खरेदीसाठी येथे लहान मुलांची लगबग चालू आहे. कपडे, ज्वेलरी, इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक्स, फर्निचर, स्टेशनरी, मोबाईल फोन्स, गृह सजावट साहित्य तसेच इतर विविध साहित्य असणाऱ्या (Alandi Diwali) शहरातील विविध भागातील दुकानांमध्ये गर्दी होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.