Alandi : माऊली मंदिरात दिवाळी पहाट या सुरेल कार्यक्रमाची रसिकांना मेजवानी

एमपीसी न्यूज : दिवाळीच्या निमित्ताने आज (गोवत्स द्वादशी) गायिका (Alandi) अंकिता जोशी यांच्या सुमधूर गायनाने माऊली मंदिरात दिवाळी पहाट या सुमधूर कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यांच्या सुमधूर गायनाने यावेळी श्रोते मंत्रमुग्ध झाले. यावेळी त्यांना तबलावादक रामकृष्ण करंबेळकर, संवादनी वादक अभिनय रवंदे, मृदुंग वादक सुखद मुंडे, टाळ वादक प्रदीप दराडे यांनी साथ संगत दिली.

शुक्रवार (धन त्रयोदशी) दि.10 नोव्हेंबर रोजी गायिका यशस्वी सरपोतदार यांची गायन सेवा संपन्न होणार आहे.  त्यांना तबला वादक अक्षय कुलकर्णी, संवादनी वादक यश खडके, मृदुंग वादक सुजित लोहर यांची साथ संगत असणारआहे.

शनिवार दि.11 रोजी गायक अतुल खांडेकर यांची गायन सेवा संपन्न होणार आहे. त्यांना साथ संगत तबलावादक ऋतुराज हिंगे, संवादनी वादक लीलाधर चक्रदेव, मृदंग वादक अविनाश पवार, प्रणव राजवाडे व भक्ती खांडेकर यांची (गायन तानपुरा ) साथ असणार आहे.

Nigdi : कमतरतेला एक आव्हान समजून संधीमध्ये रुपांतरित करा- अभयकुमार श्रीश्रीमाल

रविवार (नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन) दि.12 रोजी गायक भाग्येश मराठे यांची गायन सेवा संपन्न होणार आहे. त्यांना तबलावादक (Alandi) प्रणव गुरव, संवादनी वादक लीलाधर चक्रदेव यांची साथ संगत असणार आहे. सोमवार दि.13 रोजी गायिका अर्पणा केळकर यांची गायन सेवा संपन्न होणार आहे. त्यांना तबला वादक कौशिक केळकर, मृदंग वादक सुखद मुंडे, संवादनी वादक निवृत्ती धाबेकर, टाळ वादक विश्वास कळमकर यांची साथ संगत असणार आहे.

मंगळवार (दिवाळी पाडवा) दि.14 रोजी सुखद मुंडे यांचा नाद मृदुंग हा मृदुंग वाद्य कार्यक्रम संपन्न होणार आहे. त्यांना साथ संगत त्यांच्या शिष्य परिवाराची असणार आहे.

बुधवार (भाऊबीज) दि.15 रोजी गायक कृष्णा बोंगाणे, गायक ह भ प अंबरिष महाराज देगलूरकर यांची गायन सेवा संपन्न होणार आहे. त्यांना तबलावादक रामकृष्ण करंबेळकर, संवादनी वादक यश खडके, मृदुंग वादक किरण भोईर ,स्वर संगत वैभव कडू, भक्ती पवार, टाळ वादक ओम भोईर यांची साथ संगत असणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.