Nigdi : कमतरतेला एक आव्हान समजून संधीमध्ये रुपांतरित करा- अभयकुमार श्रीश्रीमाल

एमपीसी न्यूज – आयुष्य जगताना प्रत्येक (Nigdi) क्षणोक्षणी शिकत रहा. शिक्षणाची प्रक्रिया कधीच संपत नाही. शिकत रहा आणि स्वतःला सक्षम बनवा, आपल्या आयुष्यात कितीही संकटे आली किंवा वडिलोपार्जित संपत्ती नाही अशा तत्सम कमतरतेला कुरवाळत बसू नका तर आपल्यातील कमतरतेला एक आव्हान समजून संधीमध्ये रुपांतरित करा. काळानुसार स्वतःला बदला अन्यथा आपण कालबाह्य व्हाल असे मत जैन इंटरनॅशनल ट्रेड इंटरनॅशनलचे(जीतो) अध्यक्ष अभयकुमार श्रीश्रीमाल यांनी व्यक्त केले.

जीतो पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने निगडी येथे आयोजित करण्यात आलेल्या जैन बाधवांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी जैन इंटरनॅशनल ट्रेड इंटरनॅशनलचे(जीतो-ॲपेक्स )चे उपाध्यक्ष कांतीलालजी ओसवाल, जीतो इनोव्हेशन, टेक्नॉलॉजी, इंटरप्रेन्युअर्शिप,ॲंड मॅनेजमेंट(जितम) चे संचालक व जीतो-ॲपेक्स चे डायरेक्टर धीरजकुमार छाजेड,सेंटर फॉर एक्सलन्स आणि जितमचे उपाध्यक्ष कैलाश गोलेचा, जीतो अपेक्सच्या प्रकल्प चे सचिव तृप्ती कर्नावट, जीतो ॲपेक्सचे संचालक इन्दरकुमार छाजेड, जीतो रेस्ट ऑफ़ महाराष्ट्रचे अध्यक्ष अजित सेठिया व जीतो युथविंगचे अध्यक्ष गौरव नहार, जीतो चिंचवड पिंपरी शाखेचे माजी अध्यक्ष राजेंद्र जैन, चिंचवड पिंपरी शाखेचे माजी अध्यक्ष संतोष धोका, जीतो चिंचवड पिंपरी शाखाध्यक्ष मनिष ओसवाल, जीतो चिं-पिं शाखा मुख्य सचिव योगेश बाफना, लेडीजविंग चे अध्यक्ष वैशाली बाफना, मुख्य सचिव डॉ योगिता लुंकड, युथविंगप्रमुख सौरभ बेदमुथा, युथविंग मुख्य सचिव प्रणव खाबिया आदी जैन समाजातील मंडळी उपस्थित होती.

Mahavitaran : वीजचोरी व अनधिकृत विजवापर करणाऱ्यांना महावितरणचा दणका 83 लाखांचा अनधिकृत वीजवापर उघड

पुढे ते म्हणाले कि, सध्या व्यवसायात आव्हानात्मक स्थिती आहे. तरी नागरीकांसोबत कसे वर्तन आणि व्यवहार कसा करायचा हे (Nigdi) शिका आणि तसे आचरण करा. स्वप्न पहायला शिका. मात्र एपीजे अब्दुल कलाम यांनी म्हणटल्याप्रमाणे स्वप्न असे पहा कि ते तुम्हाला झोपू देणार नाहीत तरच तुमचे स्वप्न साकार होईल. बदलत्या कालानुरूप बदलत्या तंत्रज्ञानासोबत आपणही बदल केला पाहिजेत अन्यथा नोकिया फोन किंवा कोडॅक सारखी अवस्था आपली होईल.

सूत्रसंचालन योगेश बाफना यांनी तर आभार योगिता लुंकड यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.