Alandi : पत्नी आणि मुलांना भेटण्यासाठी आलेल्या जावयाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून मारहाण

एमपीसी न्यूज – माहेरी राहत असलेल्या पत्नी आणि मुलाला भेटण्यासाठी गेलेल्या जावयाला डोळ्यात मिरची पूड टाकून सासऱ्याने लाकडी दांडक्याने मारहाण केली. ही घटना आळंदी मधील इंद्रायणीनगर येथे घडली.

धीरज अशोक गाडे (वय 31, रा. वारजे माळवाडी, कोथरूड) यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सासरा आदिनाथ म्हस्के आणि भागवत बोराडे (दोघे रा. इंद्रायणीनगर, आळंदी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गाडे काही कामधंदा करीत नसल्याने त्यांची पत्नी आणि मुलगा त्यांच्यासोबत राहत नव्हते. 30 एप्रिल रोजी ते पत्नी आणि मुलाला भेटण्यासाठी त्यांची सासरवाडी आळंदी येथे आले. त्यावेळी त्यांचे चुलत सास-यांनी त्यांची पत्नी माहेरी नसल्याचे सांगितले.

तरीही गाडे निघून गेले नाहीत. यावरून आरोपींनी गाडे यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांना शिवीगाळ करत लाडकी दांडक्याने मारहाण केली. याबाबत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like