BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : कामगार अर्थव्यवस्थेचा कणा -अरुण मित्तल

एमपीसी न्यूज – कामगार हा औद्योगिक क्षेत्रातील अविभाज्य घटक आहे. कामगारांशिवाय औद्योगिक क्षेत्र परिपूर्ण होऊच शकत नाही. कामगार हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे, असे मत वसंत ग्रूपचे सह व्यवस्थापकीय संचालक अरुण मित्तल यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेच्या वतीने दिला जाणारा महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार यंदा चिंचवड येथील वसंत ग्रूप ऑफ़ इंडस्ट्रीजचे जॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर अरुण मित्तल यांना प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्विकारल्यानंतर ते बोलत होते.

  • हा पुरस्कार सोहळा चिंचवड येथील ऑटो क्लस्टरमध्ये पार पडला. स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. अरुण मित्तल यांनी मिळालेला पुरस्कार आई-वडील,पत्नी व बंधू यांना अर्पण केला.

या सोहळयास टाटा मोटर्सचे माजी महाव्यवस्थापक मनोहर पाराळकर, ज्येष्ठ समाजसेवक गिरीश प्रभुणे, आयोजक पुरुषोत्तम सदाफुले, रंगनाथ गोडगे सुदाम भोरे आदी उपस्थित होते. अरुण मित्तल हे पिंपरी-चिंचवड, चाकण शहरात वसंत ग्रूप गेली ४0 वर्षापासून उत्पादन क्षेत्रात कार्यरत आहे.

HB_POST_END_FTR-A2