Alandi : पालखी सोहळ्यानिमित्त आळंदी शहरात वारकऱ्यांना अन्नदान

एमपीसी न्यूज – माऊलींच्या प्रस्थान सोहळ्यानिमित्त  (Alandi) राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठानच्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याच्या वेळी  वारकरी भाविकांना  झुणका भाकरी सह बुंदीचा प्रसाद देण्यात आला.या अन्नप्रसादाचा लाभ घेण्यासाठी वारकरी भाविकांनी  मोठी गर्दी केली होती.या उपक्रमाचे आयोजन राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष अनिता झुजम यांनी केले. यावेळी शैला तापकीर, संतोषी पांडे, ताई ननावरे, सपना घायाळ , अनिता शिंदे आदी उपस्थित होते.

Yerwada : तक्रार दाखल करण्यासाठी लाच घेतल्या प्रकरणी पोलीस हवालदाराला अटक, दोघांवर गुन्हा दाखल

तसेच पालखी प्रस्थान सोहळ्या निमित्त ठीक ठिकाणी शहरात अन्नदान केले जात होते.पालखी प्रस्थान  सोहळ्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस च्या वर्धापन दिनी दोन दिवस सरबत वाटप करण्यात आले.यावेळी डी डी भोसले  , प्रकाश कुऱ्हाडे , पुष्पाताई कुऱ्हाडे, आरिफ शेख,रुपाली पानसरे,राणी रंधवे,संजय रंधवे,सतीश कुऱ्हाडे इ.राष्ट्रवादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित (Alandi) होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.