Yerwada : तक्रार दाखल करण्यासाठी लाच घेतल्या प्रकरणी पोलीस हवालदाराला अटक, दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – ट्रॅव्हल्स व्यावसायीकाला अपघाताची ( Yerwada ) तक्रार दाखल करुन घेण्यासाठी 13 हजार रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी तीन पोलीस हवालदारांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने आज (मंगळवारी) केली आहे.

पोलीस हवालदार राजेंद्र दिक्षीत याला अटक केली असून जयराम सावलकर, विनायक मुधोळकर यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. हे सर्वजण येरवडा पोलीस ठाण्यात काम करत होते. याप्रकरणी 24 वर्षीय ट्रॅव्हल्स व्यावसायीकाने तक्रार दिली होती.

Talegaon : श्रीरंग कलानिकेतनचा 38 वा वर्धापन दिन सुरांच्या संगतीने संपन्न

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार यांचा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय असून तक्रारदार यांच्या कारच्या झालेल्या अपघाताची तक्रार दाखल करायची होती. त्यासाठी  पोलीस  हवालदार जयराम सावळकर, विनायक मुधोळकर, राजेंद्र दीक्षित यांनी तक्रारदारांकडे 20 हजार रुपयांची मागणी केली.

तडजोडी अंती 13 हजार देण्याचे ठरले. ही लाच राजेंद्र दीक्षित याने येरवडा पोलीस स्टेशन येथे स्वीकारल्यावर त्याला रंगेहात ताब्यात घेण्यात आले असून,येरवडा पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक भारत साळुंखे, पोलिस निरीक्षक प्रवीण निंबाळकर,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक  मुकुंद आयाचीत, पोलीस शिपाई भूषण ठाकूर,  पोलीस शिपाई पांडुरंग माळी ( Yerwada ) यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.