Alandi: भक्तिमय वातावरणात श्री नरसिंव्ह सरस्वती स्वामी महाराज रथोत्सव साजरा

एमपीसी न्यूज -आळंदी येथील श्री नरसिंव्ह सरस्वती स्वामी महाराज मठामध्ये (Alandi) सालाबाद प्रमाणे या वर्षी सुद्धा श्री नरसिंव्ह सरस्वती स्वामी महाराज यांच्या (शके 1945) वार्षिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  

19 जानेवारी  पौष शु.नवमीला कोठी पूजन  होऊन उत्सवास प्रारंभ झाला आहे.

 

आज दि.24 रोजी सायंकाळी श्रींच्या रथोत्सवाला (Alandi)श्रींच्या मठापासून चौघड्याच्या वाद्यात, टाळ मृदुंगाच्या वाद्यासह हरिनामाच्या गजरात ,बँड च्या सुमुधुर वाद्यात व फटाक्यांच्या अतिषबाजीत सुरवात करण्यात आली.

Pune : महात्मा गांधींच्या ‘लोककल्याणकारी राज्या’च्या संकल्पनेचे देशास विस्मरण – रमेश चेन्नीथला

व श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या गाण्याच्या ध्वनीने परिसर भक्तिमय झाला होता.ठीक ठिकाणी नरसिंव्ह सरस्वती स्वामींचे पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी अनेक भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.