Alandi :इंद्रायणी घाटावरती भगवान महाराज कोकरे यांचा उपोषणाचा आजचा नववा दिवस

एमपीसी न्यूज -आळंदी येथील इंद्रायणी (Alandi)नदी घाटावरती (हवेली विभाग) भव्य राष्ट्र कल्याण सामुदायिक जन आंदोलन आमरण उपोषण ह. भ. प. भगवान महाराज कोकरे दि. 1 नोव्हेंबर पासून करत आहेत. त्यांच्या उपोषणाचा आजचा (दि.9) हा नववा दिवस सुरू आहे.दि. 8 रोजी काल त्यांची शुगर कमी झाली होती व बीपी हाय झाला होता.

त्यांची ती स्थिती पाहता पोलीस प्रशासनाने काल(Alandi) दुपारच्या दरम्यान रुग्ण वाहिका बोलावली. त्यावेळी माझं आंदोलन मी सोडणार नाही असे म्हणत भगवान महाराज कोकरे यांनी उपचारासाठी नकार दिला.

Pune : ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव झाल्याने सराईत गुन्हेगारांकडून गोळीबार

पोलीस व प्रशासनाने जबरदस्तीने उचलून(Alandi) रुग्णवाहिकेतून त्यांना उपचारासाठी (वाय सी एम रुग्णालयात)नेले होते.काल सायंकाळी 5 च्या सुमारास परत उपोषण स्थळी ते आले.

याबाबत कोकरे महाराज यांनी माहिती दिली.तसेच आज उपोषण स्थळी माजी आमदार नितीन शिंदे यांनी भेट देऊन या उपोषणास जाहीर पाठींबा दिला.कालच्या प्रकराबाबत त्यांनी प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.तसेच राष्ट्रीय वारकरी परिषद महाराष्ट्र राज्य यांनी केंद्रात व राज्यात
समान नागरी कायदा या मागणीस जाहीर पाठींब्याचे पत्र त्यांना दिले.

यावेळी आर के रांजणे ,स्वाभिमान शेतकरी संघटनेचे प्रकाश तात्या बालवडकर,संजय बालवडकर,प्रकाश महाराज जौंजाळ, गायकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

संपूर्ण भारत देशामध्ये समान नागरी कायदा व समान शिक्षण कायदा लागू करणे.जाती आधारित असलेले आरक्षण रदद करून आर्थिक निकषांवर व गुणवत्तेवर आरक्षण देण्यात यावे.महाराष्ट्रात शेतकऱ्यांने पिकविलेल्या शेत मालाला कायमस्वरूपी हमीभाव देण्यात यावा.अश्या प्रमुख मागण्यासह इतर मागण्यासाठी त्यांनी उपोषण सुरू केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.