Pune : ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव झाल्याने सराईत गुन्हेगारांकडून गोळीबार

एमपीसी न्यूज – ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव झाल्याने दोन सराईत गुन्हेगारांनी गावात (Pune)दहशत माजवण्यासाठी गोळीबार केला. तसेच पोलिसाच्या अंगावर कार घालून पोलीस कर्मचाऱ्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना इंदापूर तालुक्यातील काजड गावात घडली.

राहुल चांगदेव नरुटे, समीर मल्हारी नरुटे (दोघे रा. काजड, ता. इंदापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार गणेश काटकर यांनी वालचंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune Metro News : लक्ष्मी पूजनानिमित्त मेट्रो राहणार चार तास बंद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल हाती (Pune)आला. आरोपी राहुल आणि समीर यांनी देखील ग्रामपंचायत निवडणुक लढवली. मात्र त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला. या पराभवामुळे गावात दहशत निर्माण करण्यासाठी दोघांनी त्यांच्याकडील पिस्तुलातून हवेत गोळीबार करून दहशत निर्माण केली.

त्यामुळे फिर्यादी पोलीस अंमलदार काटकर हे त्यांच्या सहकाऱ्यांसोबत आरोपींना ताब्यात घेत होते. त्यावेळी आरोपी त्यांच्या कारमधून पळून जाऊ लागले. पोलीस अंमलदार काटकर यांनी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी काटकर यांच्या अंगावरून गाडी घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यांनतर आरोपी इंदापूर तालुक्यातील वायसेवाडी येथे कार सोडून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.

आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर वालचंदनगर पोलीस ठाण्यात सन 2016 आणि सन 2019 साली चार तर फलटण शहर पोलीस ठाण्यात सन 2019 साली एक गुन्हा दाखल आहे. वालचंदनगर पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.