Pune Metro News : लक्ष्मी पूजनानिमित्त मेट्रो राहणार चार तास बंद

एमपीसी न्यूज – पुणे मेट्रो दोन मार्गांवर सुरु झाली (Pune Metro News) आहे. सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत मेट्रो सेवा सुरु असते. मात्र दिवाळीला लक्ष्मी पूजनानिमित्त रविवारी (दि. 12) सायंकाळी सहा वाजता मेट्रो सेवा बंद केली जाणार आहे.

Pune : जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय विधी सेवा दिन साजरा

वनाझ स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानक आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानक या दोन मार्गांवर मेट्रोची सेवा सुरु आहे. पुणे मेट्रो नियमितपणे सकाळी सहा ते रात्री 10 या वेळेत सुरू आहे.

मात्र वर्षाचा सण असलेल्या दिवाळीला लक्ष्मीपूजन केले जाते. महामेट्रो कडून देखील लक्ष्मी पूजनासाठी रविवारी चार तास अगोदरच सेवा थांबवली जाणार आहे.

रविवारी सकाळी सहा ते सायंकाळी सहा या वेळेत मेट्रो सुरु राहील. तर सोमवार पासून मेट्रोची सेवा नेहमीप्रमाणे सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत सुरु राहील, असे मेट्रोकडून सांगण्यात आले (Pune Metro News) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.