Moshi : मोशी हॉस्पिटलला प्रशासकांची मंजुरी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडमधील सुमारे 30 लाख नागरिकांच्या (Moshi)आरोग्य सेवेसंदर्भातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प मोशी येथील प्रस्तावित 850 बेडच्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या खर्चाला महापालिका स्थायी समितीने प्रशासकीय मान्यता दिली. त्यामुळे भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतील आणखी एका प्रकल्पाला गती मिळाली आहे.

पिंपरी-चिंचवडमधील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (Moshi)संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामीण भागातून रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. वाढती लोकसंख्या आणि वायसीएम वरील ताण याचा विचार करुन भोसरी विधानसभा मतदार संघातील समाविष्ट गाव मोशीत मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारावे, अशी मागणी आमदार लांडगे यांनी राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाकडे केली होती.

Sangvi : विमान तिकीट बुकिंगच्या व्यवसायाच्या बहाण्याने 24 लाखांची फसवणूक

दरम्यान, राज्य सरकारच्या मंजुरीनंतर महापालिका प्रशासनाने निविदा प्रकिया राबवून मे. वॅसकॉन इंजिनिअर्स लिमिटेड या कंपनीला 340 कोटी 67 लाख 63 हजार 273 रुपयांच्या निविदा स्वीकारली आहे.

तसा प्रस्ताव स्थापत्य विभागाने स्थायी समितीकडे सादर केला होता. त्याला प्रशासक तथा आयुक्त शेखर सिह यांनी मान्यता दिली आहे. निविदा प्रक्रियेमध्ये मे. वॅसकॉन इंजिनिअर्स लिमिटेड, मे. हर्ष कन्स्ट्रक्शन प्रा. लि., मे. न्याती इंजिनिअर्स अँड कन्सलटंट प्रा. लि. यांसह अन्य पाच कंपन्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी वरील तीन कंपन्या पात्र ठरल्या होत्या. प्रशासनाने लघुत्तम दर सादर करणाऱ्या मे. वॅसकॉन इंजिनिअर्स लिमिटेडला हॉस्पिटले काम दिले आहे. मोशीतील गट क्रमांक 646 मधील गायरान जागेत हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. सदर रुग्णालय दोन टप्प्यात उभारण्यात येणार आहे.

शहरातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याचा निर्धार आम्ही ‘व्हीजन-2020’ अभियानांतर्गत केला होता. त्यानुसार राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला. महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात हा प्रकल्प प्रशासकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे रखडला होता. मात्र, महायुती सरकारच्या काळात प्रकल्पाला गती देण्यात आली. मोशीत होणारे 850 बेडचे हॉस्पिटल जिल्ह्याची आरोग्यवाहिनी म्हणून ओळखले जाईल. प्रशासनाने पुढील प्रक्रिया करुन कामाला सुरूवात करावी, अशी अपेक्षा असल्याचे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.

… असे असेल मोशी हॉस्पिटल
मोशीत एकूण आठ मजली हॉस्टिटल उभारण्यात येणार आहे. त्यामध्ये ओपीडी व जनरल मेडिसिन विभाग असेल. तसेच, कान-नाक-घसा, नेत्र विभाग, सीटी स्कॅन व एमआरआयची सुविधा, रेडिओलॉजी, डे केअर विभाग, सोनोग्राफी, पेडियाट्रिक, सायकॅट्रिक, त्वचारोग, स्त्रीरोग व श्वसन नलिकांचे आजार यासंबंधित ओपीडी असेल. सर्जरी विभाग, भाजलेले रुग्ण, कॅन्सर रुग्ण, डायलिसिस, पॅथॉलॉजी विभाग, रक्तपेढी व 180 आसन क्षमतेचे कॅन्टीन, ऑपरेशन थिएटर व आयसीयू कॉम्प्लेक्स, जनरल मेडिसिन व नेत्र रुग्ण वॉर्ड असेल. पाचवा मजला जनरल सर्जरी, कान-नाक- घसा वॉर्ड, जनरल सर्जरी, कान-नाक- घसा वॉर्ड असेल. बालरोग वॉर्ड, अस्थिरोग, स्त्री रोग, त्वचारोग व मानसिक रुग्णांचे वॉर्ड, 250 क्षमतेचे लेक्चर हॉल, तसेच पुरेशी जागा उपलब्ध असल्यामुळे या ठिकाणी पिपरी- चिंचवड मेडिकल कॉलेज, पॅरामेडिकल कोर्सेस कॉलेज, कॉलेज उभारण्याबाबत महापालिका प्रशासन सकारात्मक आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.