Sangvi : विमान तिकीट बुकिंगच्या व्यवसायाच्या बहाण्याने 24 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – विमानाचे तिकीट बुकिंग करण्याचा (Sangvi) व्यवसाय देण्याच्या बहाण्याने एका महिलेची 24 लाख 87 हजारांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार चार नोव्हेंबर ते आठ नोव्हेंबर या कालावधीत घडला आहे.

याप्रकरणी महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात(Sangvi) फिर्यादी दिली आहे. त्यानुसार 7085652328 क्रमांकावरून टेलिग्रामद्वारे बोलणाऱ्या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chakan : समोरील वाहनास धडकल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला आरोपी महिलेने टेलिग्राम वरून संपर्क केला. एक वेबसाईट पाठवून त्यावरून विमानाचे तिकीट बुकिंग करण्याचे काम करून चांगले कमिशन मिळवून देण्याचे आरोपी महिलेने आमिष दाखवले. सुरुवातीला फिर्यादी महिलेस 18 हजार रुपये कमिशन देण्यात आले. त्यानंतर मात्र फिर्यादी कडून वारंवार पैसे घेत त्यांची 24 लाख 87 हजार 528 रुपयांची फसवणूक करण्यात आली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.