Chinchwad : पोलीस आयुक्तालयाने घेतला आंदोलकांचा धसका

एमपीसी न्यूज – आंदोलक आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ( Chinchwad ) शासकीय इमारतीवरून उड्या मारतात. शासकीय इमारतीवरून आंदोलकांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी उड्या मारण्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे शासकीय इमारतींवर जाळी बसवली जाते. त्याच धर्तीवर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीवर देखील जाळी बसवण्यात आली आहे.

मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनाचे ( Chinchwad ) ठिकठिकाणी तीव्र पडसाद उमटले आहेत. या आंदोलनाचा शासनाने चांगलाच धसका घेतला आहे.

Wakad : पेंटिंगचे काम करणाऱ्या कामगाराने मोबाईल आणि रोख रक्कम नेली चोरून

मराठा समाजातील अनेक जणांनी आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्येचे पाऊल उचलले आहे. पुढील काळात मराठा आंदोलन आणि अन्य आंदोलने तीव्र होऊन त्याचे पडसाद उमटू नये यासाठी शासन प्रत्येक पातळीवर खबरदारी घेत आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात दररोज शेकडो नागरिकांची ये-जा सुरु असते. तक्रारदार आपली कैफियत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मांडण्यासाठी तासंतास आयुक्तालयात बसून असतात.

त्यातच एखाद्याने टोकाचे पाऊल उचलून उडी मारण्याची घटना घडू नये यासाठी पोलिसांनी देखील खबरदारी घेतली आहे. अशा प्रकारांमधून होणारी हानी टाळण्यासाठी आयुक्तालयाच्या इमारतीवर जाळी बसवण्यात आली ( Chinchwad ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.