Wakad : पेंटिंगचे काम करणाऱ्या कामगाराने मोबाईल आणि रोख रक्कम नेली चोरून

एमपीसी न्यूज – पेंटिंगचे काम करणाऱ्या कामगाराने मालकाच्या (Wakad) घरात चोरी केली. घरातून मोबाईल आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि. 7) रात्री दीड वाजताच्या सुमारास श्रीराम कॉलनी वाकड येथे घडली.

अनीरूल कनीकराम चौहान (वय 22, रा. उत्तर प्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी नूर नबी मोहम्मद शेख (वय 40, रा. थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Chakan : समोरील वाहनास धडकल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनीरुल हा फिर्यादी यांच्याकडे पेंटिंगचे काम करत होता. त्याने फिर्यादी यांच्या घरातून 30 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन आणि 35 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड (Wakad) पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.