Chakan : समोरील वाहनास धडकल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – समोर जाणाऱ्या वाहनाला धडक दिल्याने (Chakan) दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 7) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास मुटकेवाडी ते तळेगाव चौक चाकण या दरम्यान घडली.
समीर पोपट सांडभोर (वय 37, रा. राक्षेवाडी, ता. खेड) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी अविनाश पोपट सांडभोर (वय 39) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ समीर सांडभोर हे कंपनीतून घरी येत होते. मुटकेवाडी ते तळेगाव चौक दरम्यान येत असताना चाकण उड्डाण पुलावर त्यांच्या दुचाकीने समोरून जाणाऱ्या एका वाहनास पाठीमागून जोरात धडक दिली.
यामध्ये समीर हे गंभीर जखमी होऊन त्यांचा त्यात मृत्यू झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास (Chakan) करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.