Pimple Gurav : पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या कारणावरून चार जणांनी (Pimple Gurav)मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. तसेच कोयत्याने वार करत जखमी केले. ही घटना 4 नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास साठ फुटी रोड, पिंपळे गुरव येथे घडली.

यश सचिन चव्हाण (वय 19, रा. पिंपळे गुरव) असे जखमी (Pimple Gurav)तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अंश उर्फ नन्या पिल्ले (रा. पिंपळे गुरव) आणि अन्य तीन अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bhosari : एमआयडीसी भोसरी येथे गांजा विक्री प्रकरणी एकास अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यश हे साठ फुटी रोड येथील ममता स्वीट या दुकानातून वेफर्सचे पाकीट घेऊन बाहेर आले. तिथे आलेल्या आरोपींनी जुन्या भांडणाच्या कारणावरून यश यांच्याशी वाद घातला. त्यानंतर हाताने मारहाण केली. त्यातील एकाने यश यांच्या डोक्यात कोयत्याने वार केले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.