Chakan : खंडणी विरोधी पथकाने ठोकल्या दोघांना बेड्या ;तीन पिस्टल, सहा जिवंत काडतुसे जप्त

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी (Chakan)विरोधी पथकाने एका सराईत गुन्हेगाराला आणि त्याच्या साथीदाराला अटक केली. दोघांकडून तीन पिस्टल आणि सहा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे.

राहुल शहादेव माने (वय 23, रा. बालाजीनगर, चाकण), तुषार बाबासाहेब मस्के (वय 23, रा. गवळवाडी, सराटा, बीड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

Talegaon Dabhade : तृतीयपंथीयांकडे हप्ता मागणाऱ्या पाच जणांना अटक

पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, (Chakan)खंडणी विरोधी पथकातील पोलीस अंमलदार निशांत काळे, विजय नलगे आणि सुधीर डोळस यांना माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार राहुल माने हा आंबेठाण चौकात थांबला असून त्याच्याकडे पिस्टल सारखे हत्यार आहे. त्यानुसार खंडणी विरोधी पथकातील पोलिसांनी आंबेठाण चौकात सापळा लाऊन राहुल माने याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक पिस्टल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली.

त्याच्याकडे तपास करत असताना त्याचा साथीदार तुषार मस्के यालाही ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून दोन पिस्टल आणि चार जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली. या कारवाईमध्ये एकूण एक लाख 53 हजार रुपये किमतीचे तीन पिस्टल आणि सहा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे.

आरोपी राहुल माने हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्या विरोधात सन 2019 मध्ये खुनाचा प्रयत्न आणि अल्पवयीन मुलीचे अपहरण व लैंगिक अत्याचार असे दोन गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध अधिनियमान्वये (मोका) कारवाई करण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.