Talegaon Dabhade : तृतीयपंथीयांकडे हप्ता मागणाऱ्या पाच जणांना अटक

एमपीसी न्यूज – या परिसरात भिक मागायची असेल तर (Talegaon Dabhade)हप्ता द्यावा लागेल अशी दमदाटी करून तब्बल सव्वा लाख रुपयांचा हप्ता घेणाऱ्या पाच जणांना तळेगाव दाभाडे पोलिसांनी अटक केले आहे.हा प्रकार तळेगाव येथे मागील दहा ते अकरा महिन्यापासून सुरू होता.

याप्रकरणी नंदकिशोर उर्फ नंदिनी ज्ञानेश्वर पेढेकर (वय 30 रा.वाल्हेकरवडी) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस (Talegaon Dabhade)ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी प्रकाश उर्फ बाळा प्रमोद शेंडे (वय 27) , अजय महादेव भंडलकर (वय 23) अमित मुरलीधर पवार (वय 28) आकाश विजय कुडालकर (वय 20) निशान वसंतराज गायकवाड (वय 28) सर्वजण राहणार तळेगाव दाभाडे यांना पोलिसांनी अटक केली आहे.

Bjp : आगामी निवडणुकांमध्ये भाजप एक नंबरचा पक्ष ठरेल – मकरंद देशपांडे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे तृतीयपंथी आहेत. ते व त्यांच्या इतर चार मैत्रिणी हे तळेगाव जवळील कॅम्प रोड परिसरात भीक मागण्याचे काम करतात.

मात्र आरोपींनी जानेवारी 2023 मध्ये त्यांना हटकले व रोडच्या कडेला थांबल्याबद्दल शिवीगाळ केली. इथे उभा राहून भी मागायचे असेल तर आम्हाला हप्ता द्यावा लागेल जागा तुमची नाही असे म्हणत त्यांना धमकी दिली या दहशती नंतर फिर्यादी व त्यांच्या मैत्रिणी यांनी जानेवारी 2023 ते पाच नोव्हेंबर 2023 कालावधीत तब्बल 1 लाख 12 हजार 500 रुपयांचा हप्ता दिला. ही रक्कम रोख व कधी ऑनलाईन स्वरूपात स्वीकारली.

त्यांच्या रोजच्या या त्रासाला कंटाळून अखेर फिर्यादी यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिरत दिली. त्यानुसार पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली आहे व पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.