Alandi : एमआयटी महाविद्यालयातील पार्थची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद

एमपीसी न्यूज : आळंदी येथील (Alandi) एमआयटी कनिष्ठ महाविद्यालयातील वाणिज्य विद्याशाखेतील  बारावीमध्ये शिकत असलेला पार्थ राजदत्त जगताप या विद्यार्थ्याने 30 ऑक्टोबर 2023 रोजी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये 30 सेकांदात 58 बैठका (हाफ स्कॉट) मारण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदवला.

या यशाबद्दल बोलताना पार्थ जगताप याने सांगितले, की हा विक्रम साध्य करण्यासाठी भारत सरकारच्या संकेत स्थळावर 30  सेकंदाची ध्वनिचित्रफीत द्यावी लागते. त्या नंतर तज्ज्ञाकडून परीक्षांणाअंती त्याची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये केली जाते.

Alandi : एमआयटी संत ज्ञानेश्वर बीएड कॉलेजमध्ये प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा संपन्न

या बद्दल त्याला भारत सरकार तर्फे प्रशस्तीपत्रक, पदक व पेन – वही मिळाले. पार्थने या पूर्वीही 2020 साली ‘इंडिया बुक ऑफ (Alandi) रेकॉर्ड’मध्ये ‘जम्पिंग जॅक’ या प्रकारात 1 मिनिटामध्ये  112 जम्पिंग जॅक करून विक्रम नोंदवला आहे.

एमआयटी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सदाशिव कुंभार, उपप्राचार्य डॉ. ओंकार इनामदार व सर्व शिक्षकवृंद यांचे पार्थला मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

एमआयटी ग्रुपच्या शैक्षणिक प्रमुख डॉ. ज्योती ज्योतवानी व एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटच्या विश्वस्थ प्रा. स्वाती कराड – चाटे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.