Alandi : एमआयटी संत ज्ञानेश्वर बीएड कॉलेजमध्ये प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा संपन्न

एमपीसी न्यूज : आळंदी (Alandi) येथील माईर्स, एम.आय.टी.संत ज्ञानेश्वर बी.एड.कॉलेजमध्ये शैक्षणिक वर्ष 2023-24 च्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सरस्वती विश्व विद्यालयाच्या प्राचार्या डॉ.क्षमा गार्गे यांनी चारित्र्य संपन्न शिक्षक कसा घडला जातो यावर मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेंद्र हेरकळ यांनी पाहुण्यांचा सत्कार व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

प्रवेशित विद्यार्थ्यांना डॅा. सुरेंद्र हेरकळ यांनी बी.एड.अभ्यासक्रमाची ओळख करून दिली. विद्यार्थ्यांच्या अंगी विविध कलागुण लपलेले असतात. याची त्यांना जाणीव करून देण्यासाठी प्रा.अंगद जावळे यांनी “प्रतिभा शोध कार्यक्रम” आयोजित केला.

याबरोबरच विद्यार्थ्यांकडून “आनंद निर्देशांक” भरून घेण्यात आला. झेप घेणाऱ्या पंखांना ज्ञानाचे बळ देणारी पुस्तके असतात. यासाठी पुस्तके व विविध संदर्भ ग्रंथांनी सुसज्ज असे ग्रंथालय दाखविण्यात आले. ग्रंथपाल डॉ.शिल्पा गावंडे यांनी ग्रंथालयाची माहिती व नियम सांगितले.

Bjp : आगामी निवडणुकांमध्ये भाजप एक नंबरचा पक्ष ठरेल – मकरंद देशपांडे

प्रा.शेखर क्षीरसागर यांनी स्टेशनरी वाटप केले. विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन प्रा.संदीप गाडिलकर (Alandi) यांनी केले. कार्यक्रमास प्रा. संजय शिंदे, डॉ. विकास तुपसुंदर, प्रा.दर्शना पवार व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांचे व पाहुण्यांचे स्वागत डॉ. गंगोत्री रोकडे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.दिशा ठाकूर यांनी केला. सूत्रसंचालन द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनी क्रिती शुक्ला व ज्योती नायकर यांनी केले, तर आभार डॉ. प्रतिभा दाभाडे यांनी मानले. याबाबत माहिती राहुल बाराथे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.