Bjp : आगामी निवडणुकांमध्ये भाजप एक नंबरचा पक्ष ठरेल – मकरंद देशपांडे

एमपीसी न्यूज –  राज्यात नुकत्याच झालेल्या (Bjp) ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा सर्वाधिक जागा मिळवून नंबर- 1 चा पक्ष राहिला. आगामी लोकसभा, स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा निवडणुकीतही भाजप हा एक नंबरचा पक्ष ठरेल, असा विश्वास भाजपा पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांनी व्यक्त केला.

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनता पार्टी, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कार्यकारिणीची संघटनात्मक आढावा बैठक बुधवारी सायंकाळी भाजप कार्यालय, पिंपरी येथे घेण्यात आली. त्यावेळी पदाधिकारी व सदस्यांनी मार्गदर्शन करतेवेळी ते बोलत होते.

यावेळी, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक योगेश बाचल, माजी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, वरिष्ठ उपाध्यक्ष व प्रवक्ते राजू दुर्गे, सरचिटणीस शितल शिंदे, संजय मंगोडेकर, अजय पाताडे, शैला मोळक, युवा मोर्चा अध्यक्ष तुषार हिंगे, महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे, पिंपरी विधानसभा प्रमुख अमित गोरखे, चिंचवड विधानसभा प्रमुख काळूराम बारणे, भिमा बोबडे, रवी देशपांडे, बाळासाहेब भुंबे, विनोद मालू, आशा काळे, पोपट हजारे, मधुकर बच्चे, सिध्देश्वर बारणे, नामदेव पवार, राजश्री जायभाय, सुरेखा बनकर, गुलाब बनकर, संतोष तापकीर, निलेश अष्टेकर, सोमनाथ भोंडवे, महेंद्र बाविस्कर, विशाल वाळुंजकर, नंदू कदम, अजय दुधभाते, सागर फुगे, देवदत्त लांडे, शिवदास हांडे, सज्जाद तांबोळी, अमेय देशपांडे, दिपक भंडारी आदी उपस्थित होते.

Chinchwad : पाच दिवसांत पुन्हा फेसाळली पवनामाई; पर्यावरण प्रेमींकडून संताप

प्रसंगी शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी बैठकीत (BJP) उपस्थितांना मार्गदर्शन केले. राज्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा सर्वाधिक जागा मिळवून नंबर एक चा पक्ष राहिल्याबद्दल विजेते उमेदवार, पक्षाचे कार्यकर्ते, भाजपा परिवारातील सदस्य यांचे अभिनंदन करण्यात आले.

तसेच, विश्वकर्मा योजना बुथपर्यंत नेणेबाबत चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर, महाविजय 2024 च्या अनुषंगाने 20 नोव्हेंबर 2023 पर्यंत भाजपाच्या संपूर्ण जिल्हा, मंडल कार्यकारणी, मोर्चे तसेच सर्व आघाडी यांची कार्यकारणी पूर्ण तयार करण्यात याव्यात, याबाबत ठराव पारित करण्यात आला.

त्याचप्रमाणे इतर संघटनात्मक कामांचा आढावा देखील भाजपा पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांनी घेतला. आगामी लोकसभा स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा निवडणुकीतही भाजप हा एक नंबरचा पक्ष ठरेल, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.