Chinchwad : पाच दिवसांत पुन्हा फेसाळली पवनामाई; पर्यावरण प्रेमींकडून संताप

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराला (Chinchwad) पाणीपुरवठा करणारी पवना नदी पाच दिवसात दुसऱ्यांदा फेसाळली आहे. पावसाळ्यापासून आत्तापर्यंत पाच वेळा नदी फेसाळली आहे. त्यामुळे पर्यावरण प्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे. महापालिका प्रशासन तेवढ्यापुरते नदी स्वच्छ करते, परंतु, कायमस्वरूपी उपाययोजना करत नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातून पवना, इंद्रायणी आणि मुळा या तीन नद्या वाहतात. पवना नदीची महापालिका हद्दीतील लांबी 24.34 किलोमीटर, इंद्रायणी नदीची एकूण लांबी 20.85 किलोमीटर आहे. तर मुळा नदी शहराच्या सीमेवरून 10 किलोमीटर अंतर वाहते. तळवडेपासून च-होलीपर्यंत इंद्रायणी नदीचे प्रदूषण वाढले आहे. तर, किवळेपासून दापोडीपर्यंत पवना नदीचे प्रदूषण वाढले आहे. नदीलगतच्या भागात किवळे, पुनावळे, रावेत, ताथवडे, वाल्हेकरवाडी, थेरगाव, चिंचवडगाव, काळेवाडी, पिंपरी, दापोडी, पिंपळेगुरव, सांगवी, कासारवाडी व दापोडीपर्यंत पाण्याचे प्रदूषण वाढल्याचे दिसून येते.

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे प्रेस फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी महेश भागीवंत; सचिवपदी केदार शिरसट

पवना नदी सातत्याने फेसाळत आहे. नदीतील पाण्यावर फेस तरंगतो. नदी प्रदूषित झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यात पाच वेळा (Chinchwad) नदी फेसाळली आहे. थेरगावातील केजुदेवी बंधारा ते चिंचवडगावातील श्री मोरया गोसावी घाट या दरम्यान पवना नदी मोठ्या प्रमाणात फेसाळते. सांडपाणी, रसायनमिश्रित पाणी नदीपात्रात सोडल्याने सातत्याने नदी फेसाळत आहे. पवनामाईची दुरावस्था झाली आहे.

पर्यावरण प्रेमी प्रशांत राऊळ म्हणाले, केंद्र, राज्य शासनाने नदी सुधार प्रकल्पात नदीकाठाचे सुशोभीकरण करण्याऐवजी नदी सुधार प्रणाली प्रकल्प राबविला पाहिजे. नदी काठ सुधारून काही उपयोग नाही. रसायनमिश्रित पाणी नदीत सोडले जाते. बांधकाम राडारोडा नदीकाठी टाकला जातो. ओढे, नाल्यावर अतिक्रमण केले जाते. ते पहिले हटविले पाहिजे. जीवंत झरे बुजून टाकले आहेत. पवना नदी नदी राहिली नसून नाला झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.