Alandi : मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज कोणी केला? सकल मराठा समाजाचा सवाल

एमपीसी न्यूज : आज आळंदीमध्ये (Alandi ) जालन्यातील अंतरवली सराटी येथील मराठा समाजातील आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचाराचा सकल मराठा परिवार, आळंदी शहर व समस्त ग्रामस्थ आळंदी देवाची यांच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.

तसेच यावेळी राज्यसरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. या लाठीचार्जचे आदेश कोणी दिले? याची पूर्णपणे सखोल चौकशी व्हावी. व संबंधित आदेश देणाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

जालन्यातील अंतरवली सराटी येथील मराठा समाजातील आंदोलकांवर झालेले लाठीचार्जचे महाराष्ट्रात विविध भागात पडसाद उमटत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.