Amitabh Bachchan News : चित्रीकरणादरम्यान अमिताभ बच्चन जखमी

एमपीसी न्यूज- बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन त्यांच्या आगामी ‘प्रोजेक्ट के’ (Projekt K) चित्रपटाच्या  चित्रीकरणादरम्यान (Amitabh Bachchan News) हैदराबादमध्ये जखमी झाले. त्यानंतर ते तत्काळ मुंबईला रवाना झाले.

 

Talegaon Dabhade News : मावळ विधानसभा क्षेत्रातील भाजपा कार्यकर्त्यांचा प्रशिक्षण वर्ग संपन्न 

‘प्रोजेक्ट के’ या चित्रपटाच्या एका अ‍ॅक्शन सीक्‍वेन्सचे चित्रीकरण करताना अमिताभ जखमी झाले असून त्यांच्या उजव्या बरगडीचे स्नायू फाटले आहेत. त्यामुळे त्यांना चित्रीकरण रद्द करावे लागले. आता या दुखापतीतून बरे होण्यासाठी त्यांना काही आठवडे लागणार आहेत.ते सध्या त्यांच्या मुंबईतील घरी विश्रांती घेत आहे.अमिताभ यांनी स्वत: त्यांच्या ब्लॉगवर हेल्थ अपडेट शेअर केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.