Talegaon News : सोमाटणे टोलनाका हटाव कृती समितीतर्फे ‘तळेगाव बंद’ ची हाक

एमपीसी न्यूज  – मुंबई महामार्गावरील सोमाटणे येथील अनधिकृत टोलनाका (Talegaon News) कायमचा बंद व्हावा, यासाठी सोमाटणे टोलनाका  हटाव कृती समिती अधिक आक्रमक झाली आहे. गुरुवारी (दि.9 मार्च) तळेगाव दाभाडे शहर पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत.

आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी तळेगावमध्ये जोशीवाडी येथील श्री विठ्ठल मंदिरात रविवारी (दि.5) बैठक पार पडली. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यात वरील निर्णय घेण्यात आला.

Talegaon Dabhade News : मावळ विधानसभा क्षेत्रातील भाजपा कार्यकर्त्यांचा प्रशिक्षण वर्ग संपन्न 

शनिवार (दि. 11) रोजी  सोमाटणे टोलनाका येथे बेमुदत निवासी आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांनी  दिला.आवारे म्हणाले की, हे आंदोलन कायद्याचे पालन करून अहिंसक मार्गाने करण्यात येणार आहे.

Amitabh Bachchan News : चित्रीकरणादरम्यान अमिताभ बच्चन जखमी

सोमाटणे टोलनाका बेकायदेशीर आहे, या संदर्भातील सहा कागदपत्रांचे पुरावे दिले आहेत. आमच्या आरोपात तथ्य आहे.सोमाटणे टोलनाका अधिकृत आहे. यासंदर्भातील एक तरी पुरावा टोलनाका प्रशासनाने सादर करावा. टोलनाक्यावर प्रेम असणाऱ्या मंडळींनी व टोलनाक्याकडून पाकीट सुरू असणाऱ्या मंडळींनी सदर आंदोलनाला येऊ नये, असा निर्वाणीचा इशारा आवारे यांनी दिला आहे.

तळेगाव शहरातील सर्व व्यापारी, भाजी विक्रेते रिक्षा चालक संघटना टेम्पो (Talegaon News) चालक संघटना या सर्वांनी या बंदला पाठिंबा जाहीर केला आहे.

यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र जांभूळकर, माजी उपनगराध्यक्ष सुशील सैंदाणे, तळेगाव दाभाडे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश काकडे, आशिष खांडगे,माजी नगरसेवक निखिल भगत, संतोष शिंदे, सुनील कारंडे, सुनील मुन्ना मोरे, कल्पेश भगत, संतोष शेळके, अंकुश ढोरे, मुन्ना जाधव, प्रमोद देशक, सुनील पवार, अनिल पवार, गणेश बाबर, सतीश ढेंभे, दिलीप डोळस, महेंद्र ओसवाल उपस्थित होते.

कल्पेश भगत यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र जांभूळकर, सुशील सैंदाणे, गणेश काकडे, दिलीप डोळस, सतीश ढेंबे, गणेश बाबर यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.