New Music Video: गुरु गीतातून एका गायिकेचा संगीत प्रवास उलगडण्याचा प्रयत्न ….

एमपीसी न्यूज – श्रावण महिन्यातील पहिल्या गुरुवारी (17 ऑगस्ट) गुरुगीत हा म्युझिक व्हिडीओ युट्यूबच्या (New Music Video) माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आला. शब्द संगीत आणि दिग्दर्शन नंदिनी भुवड यांचे असून या भक्ती गीताची गायिका आणि नायिका आहे भाग्यश्री मोघे!

Maval : सहारा वृद्धाश्रमात आलाप एंटरटेनमेंटचा ऑर्केस्ट्रा; निराधार वृद्धांचे मनोरंजन

आपल्या जीवनातील प्रथम गुरु म्हणजे आपले पालक आणि मग जीवनाच्या विविध टप्प्यांवर आपल्याला अनेक गुरु मार्गदर्शन करतात. त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या या गीताची संगीत निर्मिती डॉ. अथर्व जोशी यांनी केली असून इन्फिनिटी या त्यांच्याच स्टुडीओमध्ये गाण्याचे ध्वनीमुद्रण झाले आहे.

सुदर्शन जोगवाडे यांनी छायाचित्रण केले असून ऋषीराज जोशी व भाग्यश्री गावस्कर यांनी एडिटिंग केले आहे . या गीतात आईच्या भूमिकेत अपर्णा गोरे व गायन गुरुच्या भूमिकेत मधुरा नवरे सहभागी झाल्या आहेत.

या गीताचे निर्माते रवींद्र भुवड आहेत. कर्वेनगर येथील गजानन महाराज मंदिर व अलंकार दत्त मंदिर येथे या गीताचे चित्रीकरण झाले आहे.

नंदिनी भुवड यांचा हा दुसरा प्रकल्प असून या आधी त्यांनी एमएस्सीचा फायनल प्रोजेक्ट म्हणून स्वरचित कथेवर आधारित ‘दीड दमडीचं तेल’ हा लघुपट तयार केला. आजी-नातीची ही गोष्ट म्हणजेच वर्थ एव्हरी पेनी फिल्म फेस्टिवलमध्ये गाजत असून या शॉर्ट फिल्मला ब्रुसेल्स कॅपिटल फेस्टिवलचा अंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे . एकूण पाच पुरस्कार व नऊ नामांकने प्राप्त ‘दीड दमडीचं तेल’ ही फिल्म लवकरच प्रदर्शित होऊन सर्वांच्या भेटीस येणार आहे.

आगामी काळात आणखी एका गीतासह नंदिनी भुवड आपला तिसरा प्रकल्प घेऊन येणार आहेत .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.