Maval : सहारा वृद्धाश्रमात आलाप एंटरटेनमेंटचा ऑर्केस्ट्रा; निराधार वृद्धांचे मनोरंजन

एमपीसी न्यूज – आंदर मावळ (Maval) मधील कुसवली या आदिवासी गावात निराधार आजी आजोबांसाठी चालवला जात असलेल्या सहारा वृद्धाश्रमात आलाप एंटरटेनमेंट प्रस्तुत प्रशांत साळवी आणि त्यांच्या टीमने बहारदार ऑर्केस्ट्रा सादर केला. तसेच वृद्धाश्रमात धान्याचे वाटप करण्यात आले.

Chakan : कांद्यावरील निर्यात शुल्कवाढी नंतर शेतकरी आक्रमक; चाकण येथे चक्काजाम आंदोलन

सहारा वृद्धाश्रमात 14 वृद्धांचे वास्तव्य आहे. आश्रमाच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आलाप एन्टरटेन्मेंटच्या वतीने प्रशांत साळवी व त्यांचे सहकारी प्रणिता बनसोडे, तुषार झित्रे, सुवर्णा कोळी, सीमा बन्सल, नमिता खारकर, प्रशांत ढेकणे, शाम शिसोदे, डॉ. केदार वळसणकर, सुनील भावसार यांनी हा बहारदार कार्यक्रम सादर केला.

आजी आजोबांना श्रवणीय पाच हजार गाणी ऐकण्यासाठी ‘सारेगामा कारवा’ हा रेडीओ साळवी यांनी भेट दिला. तसेच एक महिना पुरेल इतके धान्य दिले. तब्बल तीन तास मराठी व हिंदी गीते सादर करत केली.

धमाल व ताल धरणारी गाणी सादर करून आजी आजोबांना ठेका धरायला भाग पाडले. कुसवली ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला हजेरी लावली. वृद्धाश्रमाचे संचालक विजय जगताप यांनी स्वागत केले. शारदा मुंडे यांनी आभार मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.